आत्मा मलिक ध्यान पिठाच्या २१०० विद्यार्थ्यांकडून रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण;  मोठा विक्रम

आत्मा मलिक ध्यान पिठाच्या २१०० विद्यार्थ्यांकडून रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण;  मोठा विक्रम

Mass recitation of Ram Raksha Stotra by 2100 students of Atma Malik Dhyan Pitha; Big record

 राम लल्लाच्या जयघोषाने दुमदुमली कोपरगाव नगरीThe city of Kopargaon was resounding with the shouts of Ram Lalla

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun 21Jan 24, 11.10Am.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : अयोध्येत धार्मिक विधी होत आहेत.  सोहळ्यानिमित्त आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण येथील सुमारे २१०० विद्यार्थ्यांसह हजारो उपस्थित हजारो रामभक्तांनी एकत्रितपणे रामरक्षा स्तोत्राचे पठण करून एक मोठा विक्रम केला आहे. ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या यशासाठी प्रार्थना आहे . यावेळी आत्मा मलिक आश्रमाचे संत  परमानंद महाराज  म्हणाले की, आपण सर्व श्रीरामभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत हे आपले परमभाग्य आहे.

संत परमानंद महाराज पुढे म्हणाले की, 
प्रभू श्रीराम हे कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत असून, अयोध्येत २२ जानेवारीला होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा अद्भुत सोहळा केवळ भारत व आशिया खंडच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे.  या सोहळ्यानिमित्त कोपरगावच्या अलंकापुरी नगरीच्या पावन भूमीत आज हजारो रामभक्तांनी श्रीरामरक्षा स्तोत्राचे सामुदायिक पठण करून प्रभू श्रीरामाचा जागर केला. सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या संकल्पनेतून आज झालेला हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.निश्चितच आजचे हे सामूहिक  रामरक्षा  स्तोत्र म्हणण्याचा  मोठा विक्रम  ठरणार आहे. 
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, आज कोपरगावच्या पवित्र भूमीत होत असलेला दैदिप्यमान असा श्रीरामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण सोहळा सर्वांच्या कायम स्मरणात राहील. राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा यांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान असून, आई-वडिलांइतकेच साधू-संतांचे आशीर्वाद मोलाचे आहेत. संत-महंत आपले आयुष्य धर्मासाठी व देशासाठी समर्पित करून तरुण पिढी घडविण्याचे मोठे काम करीत आहेत. आपले आचार, विचार, संस्कार चांगले असतील तर आपला भारत देश प्रगतीच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असून, ती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असू तर आपण जीवनात खूप काही चांगले करू शकू म्हणूनच ‘मन चंगा तो कठौती में गंगा’, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे म्हटले जाते. असेही त्या म्हणाल्या राम मंदिर न्यास समितीच्या विनंतीवरून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यात शनिवारी कोपरगाव शहरात आत्मा मलिक ध्यानपीठाचे सदगुरू संत  परमानंद महाराज, विवेकानंद महाराज, निजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजनंद महाराज, चांगदेव महाराज, सत्पात्रानंद महाराज, प्रेमानंद महाराज, शेलार महाराज, भोलेनाथ महाराज, अशोक महाराज,  महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज,  गोवर्धनगिरी महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी, कोपरगाव गुरूद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजीतसिंग, राजयोगिनी ब्र. चैताली दीदी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह खास पोलंडहून आलेले परदेशी भाविक उपस्थित होते. 
 माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या सर्व संत-महंतांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच कारसेवक शंकरराव कडू, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रण समितीचे तालुकाप्रमुख नीलेश जाधव, कोपरगाव गुरूद्वारा समितीचे सेवासिंग सहानी, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचा सत्कार केला.
शनिवारी (२० जानेवारी) सकाळी
श्रीरामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा शनिवारी  अनेक संत-महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व हजारो श्रीरामभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. ‘श्री राम जय राम जय जय राम’ च्या अखंड जयघोषाने संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती. अतिशय भारावलेल्या व भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अभूतपूर्व भव्य-दिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  संपूर्ण हिंदू समाजात प्रचंड उत्साह आहे.
या भव्य दिव्य सोहळ्यासाठी माजी आमदार स्नेहलता, कोल्हे, संजीवनी उद्योग समूह, कोपरगाव गुरूद्वारा समिती, विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, बजरंग दल, शीख व पंजाबी समाजबांधव, सर्व श्रीरामभक्त आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शहरातील प्रत्येक चौकाचौकात विविध संस्थांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिर विश्वस्त समितीच्या विनंतीवरून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page