गोधेगावात अनुगामी लोकराज्य महाभियान:  श्रीराम मूर्ती स्नेहलता कोल्हे यांचे हस्ते प्रदान,

गोधेगावात अनुगामी लोकराज्य महाभियान:  श्रीराम मूर्ती स्नेहलता कोल्हे यांचे हस्ते प्रदान,

Follow-up Lokrajya Mahabhiyan in Godhegaon: Presented by Shri Ram Murthy Snehalata Kolhe,

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun 21Jan 24, 11.20Am.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अनुलोम संस्थेचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रतील सर्व अनुलोम च्या वस्ती मित्रांना अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोदंडधारी  प्रभू श्रीराम यांच्या पंचधातूच्या मूर्ती प्रदान करण्यात येत आहे.

शुक्रवारी दिनांक १९ जानेवारी  रोजी तालुक्यातील गोधेगाव येथे अनुलोम वस्तीमित्र भागीनाथ गायकवाड, अनिल भोकरे व संदीप शिरसाट यांना माजी आमदार स्नेहलता कोल्हे   यांच्या हस्ते पंचधातूची कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती श्रीरामांच्या जयघोषात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
शेकडो वर्षापूर्वीचा रामजन्मभूमीचा मुक्ती संघर्ष नुकताच संपुष्टात येऊन या जागी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा भव्यदिव्य सोहळा विश्वस्तरावर होत आहे.हा दिवस संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक व आनंदाचा दिवस असून,घरोघरी रांगोळी काढून, श्रीराम दीप लावून, गोडधोड जेवण करून भक्तिभावाने दिवाळीसारखा हा सोहळा जल्लोषात साजरा करू. या दिवशी श्रीराम नाम संकीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले. 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 
अनुलोम’ संस्थेच्या सुनंदा आदिक, ह. भ. प. दादा महाराज टुपके, बाळासाहेब कदम, कारसेवक लक्ष्मणराव भोकरे, माधवराव रांधवणे, सुभाष कानडे, रंजन साळुंके, भाऊसाहेब शिरसाट, सुदाम कोळसे, जनार्दन शिंदे, बबनराव साळुंखे, कैलास हुसळे, सुरेश कानडे, सुभाष शिरसाट, जनार्दन शिंदे, अशोक बनकर, रवींद्र रांधवणे, रमेश नारायण रांधवणे, मथुराताई दिघे, संदीप शिरसाट यांच्यासह श्रीरामभक्त व ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक वाल्मीकराव भोकरे तर सूत्रसंचालन ‘अनुलोम’चे सागर करडे महाराज यांनी केले. 
कोदंडधारी राममूर्ती प्रदान सोहळ्यासाठी मोठी शोभा यात्रा काढण्यात आली.
शोभा यात्रेत  ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.  श्री गणेश, श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची मूर्ती शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page