कोपरगाव : स्व बाळासाहेब ठाकरे यांना ९८ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
Kopargaon: Greetings to Balasaheb Thackeray on his 98th birth anniversary
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 23Jan 24, 17.40Am.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ९८ व्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव येथे रिक्षा स्टॅन्ड चौक, अहिंसा चौक व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या ठिकाणी भव्य तैलचित्र उभारून शिवसैनिक व विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिवादन करण्यात आले.
मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वाचा जागर करत निर्माण केलेली शिवसेना पुढे मोठ्या पक्षात रुपांतरीत करणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतीक पटलावर कायम हे नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ठिकठिकाणी शाखेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. सालाबाद प्रमाणे मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवसैनिकांनी वर्गणी करून मिष्टांन्न भोजन दिले. ऑटो रिक्षा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले
यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!- राजेंद्र झावरे,जिल्हा सहसंपर्कप्रमुख
मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करणारे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि ऊर्जास्त्रोत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार होते. कणखर भाषा, प्रभावशाली वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखणी हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. बाळासाहेबांनी मराठी माणसांवरील अन्यायाच्या विरोधात लढा दिला. त्यांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले.- विवेक कोल्हे युवा नेते संजीवनी प्रतिष्ठान अध्यक्ष
”बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते, ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर प्रभाव अतुलनीय आहे. त्यांचे नेतृत्व, आदर्शांप्रती अथक समर्पण, गरीब- दलितांसाठी आवाज उठवण्याची वचनबद्धता यामुळे असंख्य लोकांच्या मनात त्यांचं स्थान आहे” – ॲड. संदीप वर्पे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. – कैलास जाधव उपजिल्हाप्रमुख
हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांना सादर नमन. – चेतन खुबानी भाजप कार्यकर्ते
अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेले, महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन – योगेश बागुल माजी उपनगराध्यक्ष
वंदनीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! –सनी वाघ शहरप्रमुख
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। –कलविंदरसिंग दडियाल शहर संघटक
राज्याच्या राजकीय इतिहासातील एक अग्रणी व्यक्तिमत्व, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार, फर्डे वक्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवंदन! – प्रमोद लबडे माजी जिल्हाप्रमुख
शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! खा. सदाशिव लोखंडे
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, युवा नेते विवेक कोल्हे, शहर संघटक कलविंदर सिंग दडियाल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ॲड.संदीप वर्पे, राहुल देशपांडे, विक्रम झावरे, किरण खर्डे, संजय जगताप, संतोष गंगवाल, भाजपचे विनायक गायकवाड चेतन खुबानी, हशमभाई पटेल, माजी नगरसेवक मेहमूद सय्यद, काँग्रेसचे आकाश नागरे, शेखर कोलथे, प्रफुल्ल शिंगाडे, वर्षा शिंगाडे, बाळू घोडेवाले, विकास शर्मा, इरफान शेख, संतोष होने, दिलीप आरगडे, दिलीप सोनवणे, नरेंद्र बैरागी, कुक्कूशेठ साहनी, मकरंद जोशी, शहर सनी वाघ, नितेश बोरुडे, रवी कथले, सिद्धार्थ शेळके,मनोज कपोते, योगेश बागुल, रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, अनिल जाधव, अतुल काले, पप्पू पडियार, रंजन जाधव,राजेंद्र बागुल यांनी ठिकठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
Post Views:
160