अजित पवारांनी युती केली पण पक्षाची विचारधारा सोडली नाही : सुरज चव्हाण
Ajit Pawar formed alliance but did not give up party ideology: Suraj Chavan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 23Jan 24, 17.50Am.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विकास थांबला, कोविड पाठोपाठ सरकार गेले, आमच्या कामाचे दुसऱ्याकडून श्रेय घेतले जात होते वेगळी भुमिका घेतली विकासासाठी सेनेत सहभागी झालो आता विकासासाठी भाजपाचा घटक पक्ष झालो म्हणून विचारधारा सोडली नाही. गर्वाने सांगतो विकासासाठी गेलो. विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी अजित पवारांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काल राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटाच्या युवक मेळाव्यात बोलताना सांगितले. अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे हे होते
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मंगळवारी कृष्णाई मंगल कार्यालय येथे संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अभ्यासक विचारासाठी राष्ट्रवादी युवक मेळावा संपन्न झाला
सुरज चव्हाण म्हणाले, शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील ५३ आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी एका पत्रावर सह्या केल्या होत्या. या पत्रावर आमदार रोहित पवार यांनीही सही केली होती. त्यावेळी तुम्ही म्हणालात मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला भाजपसोबत जावे लागेल असा दावा केला होता.हाच मुद्दा पकडत सुरज चव्हाण यांनी आणि आता तुम्हाला नेता होण्याची संधी दिसायला लागल्यावर तुम्ही लगेच भूमिका बदलली. महाराष्ट्राच्या जनतेला कळुद्या त्यावेळी तुमची विचारधारा कुठे गेली होती, असा टोला सुरज चव्हाण यांनी रोहित पवार यांना लगावला.
शिर्डीला झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिबिर म्हणजे केवळ अजित पवार यांच्यावर आरोप करण्याची वकृत्व स्पर्धा होती अशी टीका करताना सुरज चव्हाण म्हणाले, यांना श्रीराम कुणी विचारला नव्हता तरीही सामाजिक द्वेष पसरविण्याच काम केलं गेलं शेवटी राम दर्शन घ्यावाच लागले, एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे लोटांगण घालायचे अशी यांची रीत झाल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.
मतदार संघाचा विकास जिथे आ. आशुतोष काळे तिथं, हे समीकरण झालं आहे. अजित पवार युतीत सामील झाले आशुतोष दादा तेव्हा तुम्ही बाहेरगावी होता वेळीच भूमिका घेतली असती तर आज परिस्थिती वेगळी दिसली असती असे सूचक वक्तव्य केले. आज रामराज्य यावे ही भविष्यातील नेतृत्वाची इच्छा आहे. तेव्हा वन बूथ टेन युथ ऐवजी आता वन युथ ट्वेंटी बूथ, करावे लागेल लवकरच तालुक्यात नोकरी महोत्सव घेऊ
११तारखेला बालेवाडी मेळाव्यात येणाऱ्या निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांना पन्नास हजाराच्या मताधिक्याने निवडून आणू असा संकल्प करा असे आव्हान शेवटी सुरज
चव्हाण यांनी केले,
आ. डॉ.किरण लहामटे म्हणाले पक्ष बांधण्याचे काम करायचे, काम नाही तर मतदार संघात फिरणे अवघड होईल. पहाटेचा शपथविधी कळायला तीन वर्षे लागली आता शरद पवार यांची गुगली समजेपर्यंत बहुतेक म्हातारा होईल. अशी मिश्किल टीका करताना सगळ्यांच ठरलं अजित पवार यांच्याबरोबर गेलो स्वतःसाठी नाही. तर मतदार संघाचा विकास करण्यासाठी गेलो, जनता दरबारात लोक म्हणायचे डॉक्टर कुठेही जा पण विकास करा, मतदार संघात दादामुळे विकास निधीचा पाऊस पडला, असल्याचे त्यांनी सांगितले
आ. आशुतोष काळे म्हणाले की, महाआघाडीत असताना अजित पवार यांनी निधी दिला होता.अजित पवार यांनी युतीबरोबर जाण्याची भूमिका का घेतली आणि आपण त्यांना का पाठिंबा दिला. तात्पर्य निवडणूक झाली लढलो, शरद पवार यांची सभा झाली. निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. निवडून आलो आता पुढे काय मतदार संघाच्या विकासासाठी निधी देणारे एकमेव नेतृत्व असल्यामुळे अजित पवार गटात सामील झालो कामे पुढे नेऊन प्रश्न सोडवू शकलो.तेंव्हा आज आपल्याला इथे संकल्प विजयाचा करायचा आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे वचन घेऊन जायचे त्यांचे हात बळकट करायचे पक्ष म्हणून महायुतीत लढणार हा संदेश घेऊन जायचं आहे.असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी अध्यक्ष आ आशुतोष काळे,आ. डॉ किरण लहामटे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सुनील गंगुले, मंदार पहाडे, विरेन बोरावके, आकाश डागा, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अशोक लव्हाटे, डॉ मच्छिंद्र बर्डे मधुकर टेके,सुरेश जाधव, विठ्ठल आसणे, अमोल आमले, सुभाष गाडे, बाबासाहेब कोते, राजेंद्र वाकचौरे, बबनराव वाळुंज,शैलेश साबळे, संदिप कपिले, कैलास गोर्डे, संजय चोरगे, किशोर बकाल, आधीच संगमनेर अकोला श्रीरामपूर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने मेळाव्यास हजर होते.
भाजप दिनेश बापूराव गाडेकर अनय विलास आढाव,राहूल शिरसाट, छोटु बैरागी भानुदास त्रिभुवन,आदीसह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला
प्रास्ताविक राष्ट्रवादी उत्तर जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सूत्रसंचालन रमेश गवळी, यांनी केले
आभार नवाज कुरेशी मानले.
चौकट
भारत हा तरुणांचा देश आहे तरुणांना राष्ट्रवादीने योग्य व्यासपीठ दिले केवळ राजकारण म्हणून त्याचा उपयोग नको, विनंती करतो संघटना म्हणून बांधणी करा, शासकीय योजना बाबत प्रबोधन करून लोकापर्यंत पोहोचवा, युवकांना योग्य दिशा देण्याचे काम करायचे आहे ते जर झाले तर देश पुन्हा सोने की चिडिया होईल – आ. आशुतोष काळे
Post Views:
68