सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाला ‘नॅक’चे ‘A++’ मानांकन – ॲड.भगीरथ शिंदे 

सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाला ‘नॅक’चे ‘A++’ मानांकन – ॲड.भगीरथ शिंदे 

Sadguru Gangagir Maharaj College awarded ‘A++’ rating by ‘NAC’ – Adv. Bhagirath Shinde

महाविद्यालयाचा  स्वायत्त होण्याचा मार्ग मोकळा Paving the way for the college to become autonomous

विद्यार्थ्यांचा तुफान जल्लोष Thunderous cheers of students

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 3 Feb 24, 16.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : रयत शिक्षण संस्था  संचालित सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि आधिस्वीकृती परिषदेची (नॅक) ‘A++’ श्रेणीसह 4 पैकी 3.69 गुण मिळाले आहेत. चतुर्थ ‘सायकल’मध्ये ही उच्च श्रेणी प्राप्त करणारे सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालय ठरले आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड.  भगीरथ शिंदे यांनी शनिवारी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही संस्था आता  स्वायत्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती  परिषद अर्थात नॅक ही संस्था महाविद्यालयाची उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासणारी दर्जेदार आणि अग्रगण्य संस्था आहे. १५ डिसेंबर २०२३ रोजी नॅक समितीचे तज्ज्ञ  अध्यक्ष प्रोफेसर डॉ. जोगेनचंद्र कलिता (प्रोफेसर, गुवाहाटी युनिव्हर्सिटी, आसाम), डॉ. शिशिर कुमार (प्रोफेसर, बाबासाहेब भीमराव आंबेडकर सेन्ट्रल युनिव्हर्बिटी लखनऊ, उत्तर प्रदेश) प्रिन्सिपल डॉ. चंदना भ‌ट्टाचार्याजी (सेवानिवृत्त प्राचार्य, महिला कॉलेज शिलांग, मेघालय) यानी दोन दिवशीय भेटीत महावि‌द्यालयाची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची सूक्ष्म तपासणी केली होती.या पाहणीनंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले असून त्यात देवगिरी महाविद्यालयास चतुर्थ ‘सायकल’मध्ये ‘A++’ हा ‘ग्रेड’ मिळाला असून महाविद्यालयाचा 3.69 गुण मिळाल्याचे  चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांनी सांगितले.

सद्गुरु गंगागिर कॉलेजला 3.69 गुण मिळाले!

महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, मूल्यांकन, संशोधन, नवनिर्मिती आणि विस्तार कार्य, मूलभूत सुविधा व शैक्षणिक सोयी, विद्यार्थी साह्य व प्रगती, निकाल, संशोधन कार्य, शोधनिबंध, प्राध्यापकांचे पेटंट, मूलभूत सुविधा, साधनांची स्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, उपकरणे, जैविक गॅस, राष्ट्रीय छात्र सेना, बोटॅनिक गार्डन, कंपोस्ट खत,  रेन हार्वेस्टिंग, ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट, गार्डन, प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून ‘नॅक’ समितीने सद्गुरु गंगागीर महाविद्यालयास नॅकचा ‘A++’ दर्जा बहाल केला आहे. संशोधन, नवनिर्मिती आणि विस्तार कार्यामध्ये महाविद्यालयास 4 पैकी 3.96 एवढे गुण मिळाले आहेत. महाविद्यालयीन पातळीवरचे हेसुद्धा सर्वोच्च गुणांकन असल्याचे शिंदे यांनी सांगितले . 
नवीन शैक्षणिक धोरणानुसारमहाविद्यालयास स्वायत्तता घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. नॅक A श्रेणीचे मानांकन घेणाऱ्या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग स्वायत्तता देत आहे. सद्गुरु गंगागीर महाविद्यालयाने तर नॅक ‘A++’ श्रेणी प्राप्त केल्याने आता यापुढे महाविद्यालय स्वायत्तता घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.असे चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 
याप्रसंगी चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, विकास कमिटी सदस्य विवेक कोल्हे, ॲड.संदीप वर्पे सुनील गंगुले, प्राचार्य डॉ. रमेश सानप आय क्यू एसी समन्वयक, कार्यालय अधीक्षक सर्व विभाग प्रमुख, आजी-माजी विद्यार्थी पालक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कोट

कोपरगावसाठी अभिमानाचा क्षण

सद्गुरु गंगागीर महाविद्यालयाला नॅक ‘A++’ श्रेणी प्राप्त झाली आहे.  हा आनंदाचा क्षण आहे. याबद्दल  महाविद्यालय संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. – युवा नेते विवेक कोल्हे विकास कमिटी सदस्य 

Leave a Reply

You cannot copy content of this page