समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! भरधाव कार कंटेनरला धडकली; तिघांचा मृत्यू; दोघे जखमी

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! भरधाव कार कंटेनरला धडकली; तिघांचा मृत्यू; दोघे जखमी

The series of accidents continues on Samriddhi Highway! Speeding car crashes into container; Three died; Both injured

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat10 Feb 24, 11.30Am.By राजेंद्र सालकर

अपघात स्थळी पाहणी करताना तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.

या अपघातात जागेवरच मृत्यू झालेले
राहुल  श्रीमंत राजभोज,(35)रा. निमखेडा, ता. जाफराबाद, उमेश दामोदर उगले (28)रा. भातोडी , ता जाफराबाद, भाऊसाहेब नामदेव पैठणे (35) रा दहेगाव ता. जाफराबाद हे सर्व जण जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील  रहिवासी आहेत.
 पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ते सर्वजण शुक्रवारी(दि.9) रात्री जाफराबाद जालना येथून MH 21 BF 9248 या क्रमांकाच्या स्विप्ट कारने शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. रोजी रात्री 9.30 च्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात स्विफ्ट कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने स्विफ्ट कारचे छत उडून गेले  यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून,  शिवहरी पांडुरंग फलके (33)रा, तपोवन आणि नरेंद्र मनसुखलाल वाघ (55) रा. टेंभुर्णी तपोवन हे गंभीर जखमी झाले आहेत.  
हे सर्वजण जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील  रहिवासी आहेत. 
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कोपरगाव तालुका पोलीस व  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल नंतर छत्रपती संभाजीनगर घाटी  रुग्णालयात दाखल केले तेथून त्यांना  सिग्मा हॉस्पीटल संभाजीनगर येथे  उपचारासाठी  दाखल  करण्यात आले आहे. मृत्यू पावलेल्या तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page