समता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा २०२४:  समता चॅलेंजर संघ विजेता

समता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा २०२४:  समता चॅलेंजर संघ विजेता

Samata Premier League Cricket Tournament 2024: Samata Challenger Team Winner

१८४ धावा करणारा फलंदाज  योगेश गीते मालिकावीर Batsman Yogesh Geete who scored 184 runs is the Man of the Series

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue13 Feb 24, 20.00Pm.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव :समता प्रीमियर लीग क्रिकेट चॅम्पियनशिप २०२४’ स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य क्रिडांगणावर पार पडला.स्पर्धेच्या  अंतिम सामन्यात समता चॅलेंजर संघाने ८ षटकात ८७ धावा केल्या,व  समता रायडर्सचा संघाला अवघ्या ६९ धावात गुंडाळून समता चॅलेंजर संघाने १८ धावानी दणदणीत विजय मिळवून समता प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024  करंडकावर आपले नाव कोरले

या अंतिम विजयी सामन्यात  ५३ धावांची धडाकेबाज खेळी करणारा समता चॅलेंजर संघाचा फलंदाज योगेश गीते सामनावीर ठरला. व  संपूर्ण स्पर्धेत १८४ धावा करून  फलंदाज  योगेश गीते मालिकावीर किताबही त्यानेच पटकविला.  

समता चॅलेंजर संघाने  समता रायडर्स संघाला नमवून प्रथम पारितोषिक मिळवले, तर पराभूत झालेल्या समता रायडर्स संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले, सुधन गोल्ड लोन स्ट्रायकर्स संघाने समता सुपर जायंटस संघावर विजय मिळवून तिसरे पारितोषिक पटकावले. 
या प्रीमियर लीगचा करंडक समता चॅलेंजर संघ  प्रथम पारितोषिक व ११, ०००/- चे द्वितीय पारितोषिक समता रायडर्स   ७,०००/- रूपये. सुधन गोल्ड लोन स्ट्रायकर्सने ५,०००/- रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
समता प्रीमियर लीग क्रिकेट चॅम्पियनशिप २०२४’ स्पर्धेत समता चॅलेंजर, समता रायडर्स, समता डेअर डेविल्स, समता जेंटलमन इलेव्हन, समता लायन्स, समता किंग्स इलेव्हन, सुधन गोल्ड लोन स्ट्रायकर्स व समता सुपर जायंटस या ८ संघात समता मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव, शिर्डी, राहता, राहुरी, श्रीरामपूर, येवला, वैजापूर शाखेतील शाखाधिकारी व कर्मचारी, सुधन गोल्ड लोनमधील अधिकारी व कर्मचारी, समता इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, वाहतूक विभागातील चालक अशा १०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सर्वसामान्य साखळी पद्धतीने सहा षटकांचे खेळण्यात आले तर उपांत्य व अंतिम सामना ८  षटकांचा  खेळण्यात आला. क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचा क्रिडा विभाग, आस्वाद मेस विभाग, वाहतूक विभाग, यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संचालक संदीप कोयटे म्हणाले की, समता सहकार शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.या स्पर्धेमुळे समताचे अधिकारी, लिपिक, लेखापाल, शिक्षक, शिपाई हे कर्मचारीच नाही तर एक उत्कृष्ट खेळाडू देखील असल्याचे दिसून आले आहे.
समता प्रीमियर लीग क्रिकेट चॅम्पियनशिप २०२४’ स्पर्धा विजेत्या संघांचा पारितोषिक वितरण समारंभ समता परिवाराचे संस्थापक  काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी, उद्योजक भरत अजमेरे यांच्या विजेत्या संघांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

You cannot copy content of this page