लोकांच्या भावना शब्दात मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा – सुनील शिंदे
Uddhav Thackeray’s Jan Samswad Yatra to put people’s sentiments into words – Sunil Shinde
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon12 Feb 24, 16.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आजच्या काळात शासनाच्या निधीचा बोजवारा उडाला या सर्व प्रश्नांवर उद्धव ठाकरेंना लोकांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्या शब्दात त्यांना मांडवाच्या आहेत त्यासाठीच जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती नगर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभेच्या ठिकाणाची पाहणी करताना सुनील शिंदे व पदाधिकारी
कोपरगाव शहरात बुधवारी उद्धव ठाकरे येत असून त्यांची सभा होणार असल्यामुळे त्याची पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी संपर्कप्रमुख सुनील शिंदे सोमवारी ( दि१२) रोजी दुपारी१२ विजता शिवसेना शहर कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे जनतेला योग्य ते कळले पाहिजे म्हणून उद्याचा दौरा निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे असेही ते म्हणाले
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा झालेला आहे इथे खून करणं सोपं झालं आहे खंडणी मागणं सोपं झालं आहे इथे गुन्हेगारांचा सन्मान होतो आहे मी सर्व सामान्यांचा कुठेतरी कोंडमारा होतो आहे अशावेळी जनतेच्या प्रश्नांना वाचन फोडण्यासाठी कुठेतरी पक्षप्रमुख म्हणून वाचा फोडली पाहीजे या दृष्टीने ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहे
कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून कोपरगावला आलेला आहे कोपरगाव मध्ये सर्व दमदार आणि ताकदीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत याचा मला अभिमान वाटतो. आणि महत्त्वाच्या क्षणी सर्व एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात याचे दर्शन पुन्हा एकदा या निमित्ताने झाले आहे. उद्धव ठाकरे येण्यापूर्वी जी तयारी करायला पाहिजे जी वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्यामध्ये आता आम्ही यशस्वी झालो. याचा अर्थ उद्धव ठाकरे आल्यानंतर केवढा जोश आणि केवढा जल्लोष या ठिकाणी राहील याची एक चांगली कल्पना या ठिकाणी करतो आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून नगरीतील सर्व शिवसेना प्रेमी, उद्धव ठाकरे यांना मानणारा व बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा चाहता वर्ग या ठिकाणी आहे या सर्व मंडळींना आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की उद्धव ठाकरे यांच्या या जनसंवाद यात्रेत आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा असे आवाहन शिंदे यांनी केले
सुनिल शिंदे पुढे म्हणाले की, शेवटी या राज्यात जे काही चाललेले आहे ते काही अलबेल नाही शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याचं दुःख प्रत्येकाला आहे या सर्व भावना एकत्र करून राज्याला भविष्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे त्यामुळे आपल्या या नगरीत आपल्याकडील नागरिकाकडून शिवसेनेचे मोठे स्वागत व्हावे अशी माझी आपल्या सर्वांना प्रार्थना आहे हा कार्यक्रम यशस्वी व्हावा शिवसेनेचे दैनंदिन कार्य या भागात आहे उद्याच्या कार्यक्रमालाही तेवढीच साथ आणि सहकार्य द्यावा अशी विनंती करतो आहे.
शिंदे म्हणाले की, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सुटले असे दाखविले जाते परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत.या उत्तरेमध्ये कोपरगाव शहर असेल शिर्डी शहर असेल अनेक ठिकाणी स्थानिक समस्या देखील अनेक आहेत आमच्या काळात आम्ही शासनाच्या निधीचे योग्य नियोजन केले होते परंतु ज्या संघटनेत आक्रमक ताकदवान दमदार कार्यकर्ते असतात त्याच्या पैकी आमची संघटना आहे विशेष करून कोपरगावात आमच्या कार्यकर्त्यांची ही जमेची बाजू आहे कापसातील मतभेद असू आपापसातील मतभेद असो की गैरसमज असो परंतु ज्या वेळेस निर्णायक क्षण येतो त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र होतो हे दाखवून दिलेले आहे ज्या बाबतीत आमचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व त्यांना साथ देणारे सर्व पदाधिकारी यांचे मी कौतुक करतो. पूर्वी आम्ही दाखवून दिलेली आहे की निर्णायक क्षणी आम्ही एकत्र येतो आमचे गट तट बाजूला करून केवळ शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून एकत्र येतो त्याचे पुन्हा एकदा चांगले उदाहरण उद्याच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून बघायला मिळेल.
शिर्डी लोकसभेसाठी वाकचौरे यांच्या नावावर शिक्का मुहूर्त दक्षिणेची जागा लढण्याची तयारी
लोकसभा निवडणुकीत शिर्डी ची जागा उद्धव ठाकरे शिवसेना आणि घटक पक्ष लढविणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जाहीर करून यावर शिवसेनेचे शिक्कामोर्तब झाले आहे. तेव्हा कामाला लागा खात्रीने सांगतो दक्षिणेत दमदार उमेदवार आमच्याकडे असल्याने ती जागा सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेना लढविणार असल्याचा दावा सुनील शिंदे यांनी केला.
निवडणुकीपूर्वी प्रत्येक जण या त्या जागेवर आपल्या पक्षाचा दावा करत असतो परंतु प्रत्यक्षात धोरणानुसारच जागावाटप केले जाते आणि त्यानुसारच शिर्डीची जागा शिवसेनेकडेच आहे याची खात्री असल्याने आमच्या पक्षप्रमुखांनी येथील उमेदवार घोषित केलेला आहे त्यामुळे याबाबतीत कुठेही काहीही चर्चा नाही, कामाला लागा, निवडून या हेच आमचे आता ध्येय आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी आमच्याकडे दमदार उमेदवार असलेले नगर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरे शिवसेना लढवणार असल्याचे मी संपर्कप्रमुख म्हणून खात्रीने सांगतो असेही ते म्हणाले
जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या माध्यमातून नगर उत्तर मध्ये शिवसेनेने लोकसभेत मोठी आघाडी घेतलेली आहे. आमच्या दृष्टीने शिर्डी लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी असली तरीही आम्ही बेसावध नाही हे लक्षात ठेवा, आम्ही प्रत्येक गोष्ट सावधपणे करीत आहोत महाराष्ट्रात शिवसेनेचे बरेच खासदार निवडून येणार आहेत, त्यात आमचा खासदार आघाडीने निवडून यावा यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहेत
यावेळी संपर्क प्रमुख सुनील शिंदे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे तालुकाप्रमुख बाळासाहेब राहाणे, महिला जिल्हा प्रमुख सपना मोरे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक सुनिल भैय्या तिवारी, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख सनी वाघ, शहर समन्वयक कालुअप्पा आव्हाड, शहरप्रमुख राखी विसपुते, माजी नगरसेवक वर्षा शिंगाडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी शहरप्रमुख असलम शेख, माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, एस टी सेना अध्यक्ष भरत मोरे, संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, माजी एसटी सेना राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे,, युवा सेना रवि कथले, अतुल काले,युवासेना उपजिल्हाप्रमुख सिध्दार्थ शेळके, युवा सेना शेखर कोलते, माजी उपशहरप्रमुख गगन हाडा, प्रफुल्ल शिंगाडे,वहातुक सेना इरफान शेख, राहुल देशपांडे, सहसंपर्क मनोज कपोते, प्रकाश शेळके, युवा सेना नितीश बोरूडे, आदिसह पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते
प्रास्ताविक राजेंद्र झावरे केले आभार कैलास जाधव यांनी मानले.
चौकट
मराठा आंदोलनाने १४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे या वरती म्हणाले त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे आणि त्यांच्या आंदोलनाला कुठेही बाधा न येऊ देता आमची जनसंवाद यात्रा होईल अशी ग्वाही पत्रकारांना शिंदे यांनी शेवटी दिली
Post Views:
266






