अजित पवार सुद्धा घराणेशाहीचे प्रॉडक्टच आहे- उध्दव ठाकरे
Ajit Pawar is also a product of dynasticism – Uddhav Thackeray
कोपरगावला पूर्ण पाणी देण्यासाठी उद्धव ठाकरेच हवेत – संजय राऊत Uddhav Thackeray wants to provide full water to Kopargaon – Sanjay Raut
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed14 Feb 24, 16.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पंतप्रधान मोदी म्हणतात, आम्हाला घराणेशाही नको, मग अशोकराव हे शंकरराव चव्हाण यांचे यांचे पुत्रच आहे ही घराणेशाही नाही मुख्यमंत्री आणि त्यांचा खासदार पुत्र ही घराणेशाही नाही अजित पवार सुद्धा घराणेशाहीचे प्रॉडक्टच आहे अशी खरमरीत टीका करून घराणेशाही वरुन उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला सुनावले.
काँग्रेसमधून आलेली, शिवसेनेमधून आलेली गद्दारांची ही सगळी तीनपाट घराणेशाही चालते पण बाळासाहेबांची घराणेशाही तुम्हाला नको आहे हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नको आहे तुम्हाला संघमुक्त भारत म्हणणारा नितीशकुमार पाहिजे आहे. काँग्रेस संस्कृतीत वाढलेली सगळी माणसं तुम्ही घेतात आणि घराणेशाही विरुद्ध तुम्ही बोंबलता मी घराणेशाहीवाला आहे , काय बोलायचं बोला माझे घराणे आहे त्या घराण्यावर महाराष्ट्र प्रेम करतो म्हणून ही लोक इकडे जमली आहेत हे माझे कर्तव्य नाही उद्धव एकटा नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात.
उद्धव ठाकरे यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात झंझावाती जनसंवाद दौरा सुरू आहे. बुधवारी (१४) रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी तुफान गर्दी उसळली होती. उद्धव ठाकरे यांचे जनतेने जंगी स्वागत केले. जनतेच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या घराणेशाहीवर घणाघात केला.
शिवसेनेचे हिंदुत्व भाजप सारखे आग लावणारे नाही तर सर्वांना सोबत घेऊन देश रक्षण करणारे हिंदुत्व आहे इतर धर्मियांना सुद्धा कळायला लागले आहेत म्हणून मुस्लिम बांधव भगिनी आमच्या सोबत येत आहेत.
फेब्रुवारी चा अर्धा महिना संपला नाही तोच महाराष्ट्रात उन्हाच्या झळा बसू लागले आहे एक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे एक टँकरची वारी करण्यासाठी साडेचार हजार रुपये खर्च करावे लागतात आणि शेतकऱ्याला रोजचे मिळतात फक्त सहाशे रुपये कोणत्या दिशेने या राज्याचा कारभार चालला आहे.
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, आपत्ती नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत, महाविकास आघाडीचे सरकार असताना मी केंद्राचे निकष बाजूला ठेवून अधिक मदत केली होती
दिवाळीच्या दरम्यान आलो त्यावेळेस शेतकरी नागरिक भेटले त्यांनी सांगितली आमची पिके करपून गेली पंधराशे कोटी देऊन निळवंडे चे धरण पूर्ण केले मग पाणी का अडवलं असे विचारल्यावर कळाले पंतप्रधानांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नव्हती. मुंबई वरळी ते मरीन ड्राईव्ह या कोस्टल रोडचे स्वप्न आमचे पैसा मुंबई महानगरपालिकेचा अर्धा भाग पूर्ण झालेला असताना त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येणार असल्याचं कळतं हरकत नाही चांगली गोष्ट आहे. पण ते जे काही डंका मारताय पिटताहेत मोदी गॅरंटी मोदी… गॅरंटी त्यांना उद्धव ठाकरे गॅरंटीचे लोकार्पण करण्याची वेळ येते आहे हे केवढे मोठे भाग्य, यापुढे उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याला आता पंतप्रधान साक्ष असतील अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
कोपरगावच्या तळ्यासाठी मी पैसे दिलेत ते काम पूर्ण होत आल्याचे ऐकलं आता ते त्याचं उद्घाटनही पंतप्रधानाच करतील असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
कोण कुठला लोखंडे शिवसेनेचे लेबल लागलं नाव पाठीमागे लागलं म्हणून सोन्यासारख्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनात नसताना जोर जबरदस्तीने श्रद्धे पायी एकदा नव्हे दोनदा निवडून दिलं त्यांन गद्दारी केली आता तो स्वतःहून गेलाय हिम्मत असेल तर भारतीय जनता पक्षाने त्याला शिर्डी मतदारसंघाचे तिकीटच देऊन दाखवावे मला खात्री या गद्दाराला पुन्हा तिकीट मिळणार नाही चूक झाली तर माफ करू शकतो चुकीला माफी असते पण गुन्ह्याला माफी नसते ज्यांनी शिवसेनेच्या पवित्र भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला भगव्यामध्ये छेद देण्याचा प्रयत्न केला या खासदाराला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे गाडलंच पाहिजे असा ठाम निश्चय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला
भगव्याबद्दल भगव्या बरोबर अनेक आणि गद्दारी केली तरी सुद्धा भगवा तेजाने फडकत राहिला आणखीही हजारो वर्ष तो असाच फडकत राहणार आहे संकट येत असतात पण ज्यांच्या हृदयात भगवा असतो ते संकटाला घाबरत नाही.
तुम्ही आज जो काही भारतरत्नांचा बाजार मांडला आहे बाजार एवढ्यासाठी म्हणतो ज्यांना ज्यांना भारतरत्न दिले ती मोठीच माणसे होती पण गेल्या दहा वर्षात तुम्हाला हे कळलं नाही की एवढी मोठी माणसे आपल्यात होऊन गेली हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा असे आम्ही म्हणत होतो निदान ते असताना त्यांना भारतरत्न दिला असता तर त्यांना आपण जे काम केलं माझी कोणीतरी दखल घेतली याचं केवढं समाधान तरी त्यांना वाटलं असतं स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारसी तुम्ही अमलात का आणल्या नाहीत असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही भारतरत्न भारतरत्न असे करीत आहात परंतु ही सगळी गोरगरीब जनता माझी भारतरत्न आहे सर्व सर्व माझ्यासोबत आहे. असे भावनिक आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.
दिल्लीच्या सीमेवर जणू का युद्ध सुरू आहे असे दिसत आहे शेतकरी येऊच नये यासाठी केंद्रसरकार अन्नदात्याविरोधात त्याचीच मुले असलेल्या पोलिसांना जवानांना बंदूक घेऊन उभे केले जात आहे, ही कुठली लोकशाही? असा संतप्त सवाल असं उद्धव ठाकरे त्यांनी केला संपूर्ण देशात हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा होणार आहे असा निर्धार व्यक्त केला
जन की बात मन की बात असे काहीच नाही शेतकरी पाहिजे तो फक्त मत देण्यापुरता मत दिलं की तुम्ही आत्महत्या केल्या तरी परवा नाही आम्ही आमच्या सुटाबुटीतील दोस्तांची खिसे भरणार निवडणुका आल्यावर मेरे प्यारे देशवासीयो आणि निवडून दिल्यानंतर फक्त माझा मित्र परिवार वाले ही तुमची मित्रशाही आहे आता या मित्रशाही संपण्यासाठी ही जनता उभी राहिलेली आहे
जात-पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त ही आपली जात समजून तुम्ही आता सर्व सोबत या तमाम देशभक्त भक्तांना सांगतो देशाचा तिरंगा देशाची लोकशाही ती कायम ठेवण्यासाठी तिचे रक्षण करण्यासाठी एकत्र या जर नाही झालं तर काय करतील सांगता येत नाही आजच मोदी सरकार म्हणून गावोगाव हे रथ घेऊन हिंडताहेत पुन्हा निवडून दिले तर ते देशाचे नाव बदलतील भाजपाचे फडकं हे राष्ट्रध्वज होऊ शकत नाही पण आमच्या तिरंग्याला हात लावायचा प्रयत्न तर केला तर तुम्हाला जळून भस्मसात करू हे सांगण्यासाठी आलो येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला येथून जो निवडून जाईल तो फक्त शिवसेनेचाच वाघ जाईल याची मला खात्री वाटते
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले काळे कोल्हे यांची इतकी वर्ष सत्ता आहे आणि आठ दिवसांनी पाणी कोपरगावला येथे म्हणजे कोपरगाव करांमध्ये मला आश्चर्य वाटते की तुम्ही कसं काय सहन करता येणारे पाणीही गढूळ गाळाचं काय करता इतकी वर्ष एवढे मोठे सम्राट राजकर्ते हा सम्राट तो सम्राट आणि प्यायला तुम्ही शुद्ध पाणी देऊ शकत नसाल तर त्या जनतेला तुमची सत्ता काय कामाची ? असा संतप्त सवाल त्यांनी केला
संजय राऊत पुढे म्हणाले, बिनडोकांनी भाजपात जायचे ज्यांना डोकं आहे बुद्धी आहे हृदय आहे ते शिवसेनेबरोबर राहतील आणि ते राहिलेले आहेत महाराष्ट्रातील चित्र दिवस अत्यंत खराब आहे चोर लपंगे दरोडेखोर यांचं राज्य महाराष्ट्र चालू आहे ते राज्य आपल्याला उलथून टाकायचे आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कोपरगाव शहराला पाणी साठवून तलावासाठी १२१ कोटी रुपये निधी दिला ते काम अंतिम टप्प्यात आहे हे काम पूर्ण करून कोपरगावला पूर्ण पाणी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे निळवंडे धरणाला पंधराशे कोटी रुपये दिले, एमआयडीसी मंजूर केली, पण अडीच वर्षे उत्तम चाललेले हे राज्य भाजपने चोरांच्या हाती दिलं आणि सगळी काम थांबली आपल्याला परत हा बदल घडवायचा आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशांमध्ये हा बदल घडवताना घडताना दिसतो आहे आज कोपरगाव चे चित्र पाहिल्यानंतर आम्हाला खात्री पटली आहे हा संपूर्ण नगर जिल्हा ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहील आणि भगवा झेंडा फडके असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला
सकाळी ११ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोपरगाव शहरात मोठ्या जल्लोषात आगमन झाले प्राथमिक प्रारंभी त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाला अभिवादन केले व व्यासपीठावर आले यावेळी उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा व फटाक्याच्या आतिजबाजीने परिसर दणदणून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता सर्व परिसरात बॅनर व भगव्या ध्वजांनी सजून गेला होता
काम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केलं सुरुवातीला माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे प्रवीण शिंदे निलेश धुमाळ यांनी आपली मनोगत व्यक्त केली
बुधवारी (१४) रोजी कोपरगाव जनसंवाद मेळावायात्रेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, शुभांगी पाटील या मान्यवरांसह जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,राष्टवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे ॲड. संदिप वर्पे, तालुकाप्रमुख बाळासाहेब राहाणे, महिला जिल्हा प्रमुख सपना मोरे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक सुनिल भैय्या तिवारी, वर्धा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, सहसंपर्क मनोज कपोते,शहरप्रमुख सनी वाघ, कोपरगाव महिला उपजिल्हाप्रमुख सारीका कुहीरे, महिला तालुकाप्रमुख सुचिता कानडे, महिला उपशहरप्रमुख पायल पवार, एसटी सेना राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे, महिला शहरप्रमुख राखी विसपुते, माजी नगरसेवक वर्षा शिंगाडे, एस टी सेना अध्यक्ष भरत मोरे, वंचित आघाडी शरद खरात, राष्ट्रीय काँग्रेस चे आकाश नागरे, डॉ म्हसे,डॉ अजय गर्जे,माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, माजी शहर समन्वयक कालुअप्पा आव्हाड, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी शहरप्रमुख असलम शेख, माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, युवा सेना रवि कथले, युवासेना उपजिल्हाप्रमुख सिध्दार्थ शेळके, युवा सेना शेखर कोलते, विक्रांत झावरे माजी उपशहरप्रमुख गगन हाडा, प्रफुल्ल शिंगाडे, वहातुक सेना इरफान शेख, विशाल झावरे आकाश कानडे, किरण खर्डे, सागर जाधव, राहुल देशपांडे, प्रकाश शेळके, युवा सेना नितीश बोरूडे, विकास शर्मा, आशिष निकुंभ, विक्रमादित्य सातभाई, दिलीप अरगडे, कुकूशेठ सहानी, ज्ञानेश्वर गोसावी, मयूर लकारे, पप्पू पडियार, रंजन जाधव आदिसह पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते. शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता