ऑटोनॉमसमुळे उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम रचनेचे स्वातंत्र्य-अमित कोल्हे 

ऑटोनॉमसमुळे उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम रचनेचे स्वातंत्र्य-अमित कोल्हे

Autonomous gives freedom to design curriculum according to the needs of the industry-Amit kolhe

संजीवनीच्या आठ अभियंत्यांची प्रिकास्ट इंडियात नोकरी Sanjeevi’s eight engineers employed in Precast India

 Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed14 Feb 24, 19.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी 20  वीस लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज केवळ संजीवनी इंजिनिअरिंगला मिळालेल्या ऑटोनॉमस दर्जामुळेच कारण उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना करणे शक्य झाल्याची माहिती संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे यांनी प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या आठ अभियंत्यांच्या सत्कार प्रसंगी दिली.

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या प्रयत्नाने सिव्हिल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना  प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या गरजेनुसार प्रशिक्षण  दिले. त्यानुसार कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून आठ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली आहे.

  यात अनुष्का संतोष आहेर,अश्विनी  अनिल जाधव, संजना संतोष  जोगदंड,  संकेत संतोष मतसागर, विशाल योगेश  सांगळे, विश्वजीत  चांगदेव राजगुरू, वझिर हजाम सरवार व भरत रामनाथ साळवे या आठ अभियंत्यांचा  समावेश  आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे यांनी आठही अभियंते व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. 

यावेळी डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डीन डाॅ. विशाल तिडके, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डाॅ.चंद्रकांत जेजुरकर, समन्वयक प्रा. अभिजीत पाबळे उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page