छ. शिवाजी महाराज  यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी-  आ. आशुतोष काळेकडुन  

छ. शिवाजी महाराज  यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी-  आ. आशुतोष काळेकडुन

Ch. Flower shower from helicopter on the occasion of Shivaji Maharaj’s 394th birth anniversary. From Ashutosh Kale

नगरपालिकेचा महामस्ताभिषेक शासकीय पूजा, काळे, कोल्हे,  व ठाकरे शिवसेनेकडून अभिवादन MunicipalityMahamastabhishek Government Pooja, Kale, Kolhe, and Thackeray Greetings from Shiv Sena

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 20 Feb 24, 19.40Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : यंदा सोमवारी १९  फेब्रुवारी २०२४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होत. त्यात वर्षी शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर आमदार आशुतोष काळे यांच्याकडून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.

तरुणांबरोबर आमदार आशुतोष काळे यांनी भगवा ध्वज फिरवित ठेका धरला
कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ वा  जन्मोत्सव सर्व शिवप्रेमींच्या उपस्थित मोठ्या भगव्यामय वातावरणात पार पडला. शहरातील डीजेच्या धून वर वेगवेगळ्या भागातून पांढरे शुभ्र ड्रेस व भगवे फेटे परिधान करून मुले व मुली  यांच्या मोठमोठ्या मिरवणुका मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत होत्या तरुण-तरुणींचा जोश व उत्साह पाहून शहरातील नागरिक भारावून गेले होते
 
छ. शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती सोहळ्या निमित्त कोपरगाव शहरात विविध धार्मिक कार्यक्रमात  सकाळी सहा वाजता नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पहाटे ५.३० वा. पहाटे  शिवमय वातावरण    मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी , उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक, पूजन, आरती विधीवत संपन्न झाला. सदरील विधीवत पूजा झाल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यगीत गायन करण्यात आले.
   यावेळी संजय जगताप, संजय काळे, मंदार आढाव, मनोज नरोडे, अनिल दीक्षित यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पालिका माध्यमिक, प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते.
सकाळी ९ वाजेपासून विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अभिवादन करून पूजा केली. सकाळी दहा साडेदहा वाजेच्या सुमारास आमदार आशुतोष  काळे यांच्याकडून हेलिकॉप्टर मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी हजारो हजारो शिवप्रेमी हिंदू प्रेमी नागरिकांनी या अविस्मरणीय क्षणाचा आनंद आपल्या डोळ्यांनी टिपला. 
आ. आशुतोष काळे  म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ वा जन्म सोहळा निमित्ताने हेलिकॉप्टरमधून शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करताना मोठे समाधान मिळाले. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत  ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. असे ही त्यांनी सांगितले.    
यावेळी अध्यक्ष सोमनाथ आढाव  रविंद्र राऊत, योगेश नरोडे व मनोज नरोडे, रहेमान कुरेशी, संतोष दळवी, राहुल शिरसाठ, राहुल चवंडके,  सुनील गंगुले आकाश डागा, मंदार  पहाडे  वीरेन  बोरावके, कृष्णा आढाव,  अशोक आव्हाटे,  रमेश गवळी, आदिसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
युवा नेते विवेक कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांचा गुलाब पुष्पांचा हार अर्पण केला
छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, समतेचे पुरस्कर्ते, आदर्श नीतिवंत राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रेरणेने विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली
सर्व राज्यकर्त्यांनी आणि युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी व सुराज्य निर्मितीसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन  युवा नेते विवेक कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना केले.
प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम आज मंगळवारी (२०)रोजी सायंकाळी ६वा  छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे होणार आहे.
यावेळी शरद थोरात, साहेबराव नरोडे,  पराग संधान,दत्ता काले,  रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे,  अविनाश पाठक, विजय आढाव,  स्वप्नील निखाडे, वैभव आढाव, भीमा संवत्सरकर, राजकुमार दवंगे, जितेंद्र रणशूर, दिनेश कांबळे, प्रमोद नरोडे, दीपक जपे, गोपीनाथ गायकवाड आधी सह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते
 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी
ठाकरे शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मा जिजाऊ  अभिवादन
साडेअकरा वाजेच्या सुमारास  उद्धव ठाकरे  शिवसेनेचे राजेंद्र झावरे, संजय सातभाई कैलास जाधव, सुनील भैया तिवारी सनी वाघ, कलविंदरसिंग दडीयाल, मनोज कपोते, प्रवीण शिंदे शिवनारायण परदेशी, वर्षा शिंगाडे, किरण खर्डे, शेखर कोलते, राहुल देशपांडे, अक्षय निकुंभ मयूर लकारे कुकुशेठ सहानी  बानितीश बोरूडे, बालाजी गोरडे इरफान शेख, सिद्धार्थ शेळके, ॲड  मोहन यादव, यांनी  सर्वांनी एकत्रित जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,व  मांसाहेब जिजाऊ यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पुष्पहार अर्पण करून पूजा केली व अभिवादन केले. नुकतेच मनोमिलन झाल्याने शिवजयंतीनिमित्त शहरात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे शक्तिप्रदर्शन दिसून आले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page