विवेक कोल्हेंची लोकप्रियता वाढेल या भितीपोटीच विखे कार्यकर्त्यांकडून विरोध – अनिल बोठे
Opposition from Vikhe activists fearing that Vivek Kolhe’s popularity will increase – Anil Bothe
खुर्चीलाच सुरुंग थेट नेत्यांपुढे आव्हान उभे ठाकले कार्यकर्ते हवालदिल Activists Havaldil challenged the Khurchicha tunnel directly in front of the leaders
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 20 Feb 24, 19.50Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : साई संस्थान शिर्डी कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीच्या १७ शून्य या चारी मुंड्या चीत विजयाने विवेक कोल्हे यांनी थेट महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे यांना थेट आव्हान देण्याचा प्रकार गत आठवड्यात घडला होता. त्याचे पडसाद काल सोमवारी (१९) फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी राहाता येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या विवेक कोल्हे यांना विखेंच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन करण्यास विरोध करण्यातून उमटले. हा विरोध साई सोसायटी निवडणुकीतील विवेक कोल्हे यांचे आव्हान भोवल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांची लोकप्रियता वाढेल या भितीपोटीच विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध झाल्याचा आरोप अनिल बोठे यांनी केला आहे
मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता विधानसभा मतदारसंघात भाजपमधील कलगीतुरा थांबण्याचे नावच घेत नाही. संगमनेर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या साथीने युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्री गणेश कारखान्याची सत्ता १८ विरूध्द एक असे घवघवीत यश मिळवत निवडणूक जिंकून आपले कौशल्य सिद्ध केले होते. श्री गणेशची ती निवडणूक ना. विखे यांच्या चांगलीच जिव्हारी लागत आहे. त्यानंतर कोपरगाव येथील एका कार्यक्रमांमध्ये नामदार राधाकृष्ण विखे यांनी थेट आमदार आशुतोष काळे यांना निवडून आणण्याची ग्यारंटी घेत कोल्हे विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती.एकप्रकारे कोल्हे यांना उघड उघड डिवचले होते.यापुर्वी गत विधानसभा निवडणुकीत आपले मेहुणे राजेश परजणे यांना उभे करून स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखेच कारणीभूत ठरले होते तशी तक्रार कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली तशी जिल्ह्यातील अनेक भाजप आमदारांनीही आपल्या पराभवास विखेच हेच कारणीभूत असल्याची तक्रार श्रेष्ठींकडे केली होती.
वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणारच मग जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे अशी भूमिका घेत स्वतः ला आणखी मजबूत करायचे आहे. त्यासाठी विवेक कोल्हे यांनी नवे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे. श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीत पाठोपाठ श्री साई संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून दिल्याने राहाता मतदार संघातील लोक विवेक कोल्हे यांच्याकडे एक खमके नेतृत्व म्हणून पाहू लागले आहेत त्यांच्या कामाची त्यांच्या प्रशासकीय कामाची पद्धत आणि गती पाहून विरोधकांना धडकी भरली आहे
आमदार आशुतोष काळे यांना बळ देऊन निवडून आणण्याचे विखे यांनी जाहीर करून कोल्हे यांना डिवचले आहे.
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातील विवेक कोल्हे व बाळासाहेब विखे एकत्र आलेले आहे विखे यांचा मतदारसंघ संगमनेर आणि कोपरगाव या दोन्ही मतदारसंघाला लागून आहे आज पर्यंत विखे यांनी विरोधी पक्षात आपल्याला हवा तो उमेदवार पेरून निवडणुकाजिंकल्या आहेत त्यामुळे यावेळी थोरात कोल्हे याव्दयीकडुन विखे यांच्या मतदारसंघात लढत चुरशीची कशी होईल,असा उमेदवार शोधला जात आहे. विखे यांच्या मतदारसंघांत सर्व प्रकारची पूर्ण ताकद लावण्यात येणार असल्याचे समजते. त्यात जिल्ह्यातून विखे यांच्याकडून दुखावलेल्यांकडूनही मदत मिळण्याची शक्यता आहे
थोडक्यात यांना इतरत्र फिरण्याइतका वेळ मिळू नये, यासाठी त्यांच्या मतदारसंघातच सर्व शक्तिनिशी नामांकित उमेदवार उतरवल्यास त्यांना मतदारसंघापुरते मर्यादित करता येणार असल्याची ही रणनीती असल्याचे समजते.
थेट आपल्या नेत्यांपुढे आव्हान उभे खुर्चीलाच सुरुंग लावल्याने हवालदिल झालेल्या विखे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांना राहात्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करू करून देण्याचे पाप केले आहे, अशा अपप्रवृत्तीचा तीव्र निषेध करतो, असे अनिल बोठे यांनी पत्रकात म्हटले आहे
Post Views:
58