नितीन कोल्हे यांनी सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे यांना समर्पित केला

नितीन कोल्हे यांनी सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे यांना समर्पित केला

Nitin Kolhe won the best polytechnic award.  dedicated to Shankarrao Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 16.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी संजीवनी सर्वोत्तम पॉलिटेक्निक हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना समर्पित केला आहे.

नितीन कोल्हे म्हणाले, “.संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे हे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी सुध्दा ४० वर्षांपूर्वी पाॅलीटेक्निक सुरू करू शकले असते, परंतु माझ्या शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं शिकून स्वावलंबी झाली पाहीजे, या हेतुने त्यांनी कोपरगांव सारख्या ग्रामीण भागात पाॅलीटेक्निक सुरू करून हजारो कुटूंबे उभी केली. त्यांनी घालुन दिलेल्या शैक्षणिक आचार संहितेनुसारच आजही कामकाज चालु असुन त्यामुळे वेगवेगळे कीर्तीमान स्थापित होत आहे. आज संजीवनी पाॅलीटेक्निकला मिळालेल्या या पुरस्काराचा अभिमान आहे. तो स्व. कोल्हे यांच्या पवित्र स्मृतिस समर्पित करीत आहे.

संजीवनी पॉलिटिकला सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्रदान करताना
सलग ९ वर्षे प्राप्त झालेले एनबीए हे सर्वोच्च मानांकन , एआयसीटीई, नवी दिल्ली, भारतातील पहिल्या पाॅलीटेक्निकला ‘मेंटर इन्स्टिटयूट ’ चा दर्जा, राज्यात शासनाच्या क्रीडा स्पर्धांत दुसरा क्रमांक, आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी आयोजीत केलेल्या ‘क्लीन अँड स्मार्ट कॅम्पस’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक, दरवर्षी ग्रामीण विध्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी मिळणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यामधिल नोकऱ्या ही बाब देखिल तितकीच महत्वपुर्ण ठरली.

संजीवनी के.बी. पी. पॉलिटेक्निकची राज्य व देश पातळीवरील गुणवत्ता व दर्जा, या संस्थेचे ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य, अशा अनेक उपलब्धींची शहानिशा करून या संस्थेला असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स या राज्य स्तरीय संघटनेने ‘सर्वोत्तम पाॅलीटेक्निक’ या पुरस्कारने पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात गौरविले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रमुख पाहुणे व माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील, चिपळुन विधान सभेचे आमदार शेखर निकम व संघटनेचे अध्यक्ष समिर वाघ यांचे हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page