आ.काळेंच्या स्वीय सहाय्यकावर तरुणांचा हल्ला, पोलिसात पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल,
A. Kalencha’s self-supporting young man’s attack, Police registered five crimes against young men,
पाच जणांना अटक; चार दिवसाची पोलीस कोठडी Five people stuck; four day police cell
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 19.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक रात्री घरी जात असताना तोंड बांधलेल्या पाच तरुणांनी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून हल्ला करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नयन गोंविंद शिंदे (वय२१) रा दत्तनगर विकी किशोर शिंदे,(वय१९) गजानन नगर,आकाश सखाराम मकोने (वय२३) दत्तनगर,भारत भाऊसाहेब आव्हाड (वय१९) निंभारा मैदान,अतुल देविदास आव्हाड (वय१९) गजानन नगर या पाच तरुणांना पाच जणांना अटक करण्यात असून न्यायालय समोर उभे करण्यात आले आहे.न्यालयाने सदर आरोपींना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
बिडवे यांचे कटींगचे दुकाणासमोर, शनीचौक, गांधीनगर, कोपरगाव येथे गुरूवारी (दि.२२) रोजी रात्री ८.४५ वा. चे सुमारास सहा ते सात अनोळखी इसमांनी एकत्रित येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून काहीएक कारण नसताना फिर्यादीस लोखंडी रॉडने, विटांनी व लाथाबुक्यांनी माराहाण करुन दुखापत केली आहे.
या घटनेप्रकरणी अशिष मिनानाथ आग्रे (वय २७) वर्ष धंदा आमदार यांचे स्वीय सहाय्यक यांनी कोपरगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव येथील आरोपी यांच्यासह पाच इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत. फिर्यादीवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Post Views:
182