कोपरगाव पालिकेविरोधात ठाकरे शिवसेना ‘ॲक्शन मोड’मध्ये ! 

कोपरगाव पालिकेविरोधात ठाकरे शिवसेना ‘ॲक्शन मोड’मध्ये ! 

Thackeray Shiv Sena in ‘action mode’ against Kopargaon Municipal Corporation!

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 19.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : अलीकडेच उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा झाल्यापासून  ठाकरे गट  पुन्हा बळकट करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत.  जनता आणि व्यापारी यांच्या प्रश्नावर भर उन्हात  मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून कोपरगाव नगर पालिकेविरोधात ठाकरे शिवसेना ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. 

नगरपालिकेचे कर्मचारी क्रेनच्या सहाय्याने दुभाजक जागेवर ठेवताना
शुक्रवारी (दि २३) रोजी शिवसेनेने मुख्य रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेल्या दुभाजकाचा  जाब विचारण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला.साडेबारा वाजेच्या भर उन्हात ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. भर उन्हात जोरदार घोषणा देत जोपर्यंत दुभाजक जागेवर टाकले जात नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली.
याप्रश्‍नी तातडीने कारवाई न केल्यास पालिकेतील  अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे  यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले आहे. 
शहरातील मुख्य रस्त्यावरील  दुभाजक नगरपालिकेने गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्त व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर  ठेवल्यामुळे बाजूला  दुकानदाराच्या धंद्याला अडचण होत होती दुभाजकाच्या बाहेर गाड्या लावल्याने गाड्या थेट रस्त्यावर येत होत्या  पर्यायाने वाहतुकीला  अडथळा निर्माण होत होता  त्यात  सध्या महिला व लहान मुले  यांचे दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे व   दुभाजक काढल्यामुळे सैरपणे गाड्या चालत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते.त्याचा व्यापारी व सायकलवर जाणारे शालेय विद्यार्थ्यी, पादचारी महिला, जेष्ठ नागरिकांना यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सातत्याने नागरिक शिवसेनेकडे प्रश्न सोडवण्याची मागणी करत होते त्याची दखल घेत शिवसेनेने याप्रश्‍नी आता आक्रमक  पवित्रा घेतला होता, शिवसेनेने याचा जाब विचारण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. 
शिवसैनिकांचे शिवसेनेच्या  स्टाईलने भर उन्हात जोपर्यंत दुभाजक जागेवर ठेवले जात नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेत सुरू असलेल्या  आंदोलनाने पालिकेचे धाबे दणाणले,गेल्या दीड महिन्यापासून व्यापारी असो की कार्यकर्ते  यांनी पालिकेला याबाबत विनंती करूनही दुर्लक्ष करणाऱ्या व  न जुमानणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या अर्ध्या तासात क्रेन सहपालिकेचे कर्मचारी हजर झाले आणि दुभाजक जागेवर लावण्याचे काम सुरू झाले तेव्हा कुठे समाधान झालेल्या माजी शहरप्रमुख भरत मोरे,माजी उपशहरप्रमुख गगन हाडा,राहुल हाडा, कान्हा हाडा,बिनय टाक,प्रसाद काळवाघे,ओम ठोंबरे,अतुल बारहाते, गोटू पटेल  गौतम निंदाने, जिवन बारहाते,गणेश भसाळे,लोकेश हाडा, दिपेश वाघमारे,यश मोरे,भैया वालझाडे,निलेश वाणी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. शिवसेनेने शिवसेनेने घेतलेल्या या आंदोलनात्मक पवित्र बद्दल शहरातील नागरिकांतून समाधान व आभार व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page