ऐतिहासिक वस्तू संग्रहालय ज्ञानाचे केंद्र – आ. आशुतोष काळे 

ऐतिहासिक वस्तू संग्रहालय ज्ञानाचे केंद्र – आ. आशुतोष काळे 

Historical Objects Museum Center of Knowledge – A. Ashutosh Kale

ऐतिहासिक वस्तू,ठेवा संग्रहित होण्याची गरज- संदीप रोहमारे Historical objects, need to be preserved-Sandeep Rohmare

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed28 Feb 24, 16.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  ऐतिहासिक वस्तुंचे जतनासाठी तालुक्यातील पहिले संग्रहालय असून यामुळे कोपरगावच्या ऐतिहासिक वैभवात निश्चितच भर पडेल. तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे संग्रहालय ज्ञानाचे केंद्र ठरेल असे म्हटले.

येथील के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील  
इतिहास विभागाची उपलब्धी असलेल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांनी केले अशी माहिती  प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
ऐतिहासिक वस्तू, ठेवा संग्रहित होण्याची गरज असल्याने  कोपरगांव परिसरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी आपल्याकडील प्राचीन ऐतिहासिक वस्तू या संग्रहालयासाठी द्याव्यात असे आवाहन संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी केले आहे.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड.संजीव कुलकर्णी, जवाहर शहा,सुनील बोरा,प्रशांत ठोंबरे,  विश्वस्त संदीप रोहमारे, डॉ.रिद्धी गोराडिया  मान्यवर उपस्थित होते.
या वस्तू संग्रहालयामध्ये प्राचीन भारतातील जनपद, गुप्त, ग्रीक, सातवाहन, विजयनगर, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, शिवकालीन, पेशवेकालीन व ब्रिटीश कालखंडापर्यंतच्या दुर्मिळ नाण्यांबरोबरच जुन्या दुर्मिळ तलवारी, ढाल व अन्य शस्त्रांची गॅलरी, पेशवेकालीन इशारतीची तोफ, ब्रिटीशकालीन कुलुपे, दुर्बीण (टेलिस्कोप), दिशादर्शक यंत्र (कंपास), भिंग, टेलीफोन, कॅलेंडर, दरवाजावरील बेल, ताम्र-पाषाणयुगीन मृदुभांडे अशा ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंदिरांचे व वास्तूंचे दुर्मिळ फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचे  दुर्मिळ चित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र हे देखील या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले आहेत.
अशोक रोहमारे म्हणाले की,  ऐतिहासिक वस्तू  संग्रहालयाच्या माध्यमातून आपला प्राचीन इतिहास व त्याकाळची साधने नवीन पिढीला कळतील असे सांगितले. 
या संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू ह्या महाबळेश्वर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणांहून संग्रहित केलेल्या असून त्या मिळविण्यासाठी प्रो.(डॉ.) के.एल.गिरमकर, नाणेतज्ञ पद्माकर प्रभुणे, मोडी लिपी तज्ञ महेश जोशी यांची मदत झाल्याची माहिती इतिहास विभागाचे प्रा. डॉ. दिलीप बागुल यांनी दिली. 

Leave a Reply

You cannot copy content of this page