जबरदस्ती सुरक्षा कर्मचाऱ्याच्या रूममध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

जबरदस्ती सुरक्षा कर्मचाऱ्याच्या रूममध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

Forced entry into the room of a security guard and threatened to kill him

दोघा सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल; अटक न्यायालयीन कोठडीA case has been registered against both brothers; Arrested in judicial custody

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue27 Feb 24, 18.10Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  जबरदस्ती सुरक्षारक्षकाच्या रूममध्ये घुसून  चाकूचा  धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई नागपूर  हायवे, येथील याठिकाणी असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी (दि.२६) रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांवर  कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला व  अटक करून  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. 

अस्लम झाकीर नदाफ वय २९ वर्षे, मुळ रा.जयसिंगपुर ता. शिरोळ जि.कोल्हापुर ह रा.एस.जी.एस कॉलेज स्टाफ क्वॉर्टर रुम नंबर ९, कोकमठाण ता.कोपरगाव,मोबिन झाकीर नदाफ वय २७ वर्षे, मुळ रा.जयसिंगपुर ता.शिरोळ जि.कोल्हापुर, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी असलम व मोबीन या दोघांनाही  अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रजोत राजु पवार (वय २३) धंदा- सुरक्षारक्षक, रा. दशरथवाडी ता.कोपरगाव यांनी सोमवारी (दि.२६) रात्री साडेअकरा वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  येथे कोकणठाण येथील एस जे एस मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक आहेत सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते आपल्या रूममध्ये आपला सहकारी याच्यासह  रूममध्ये उपस्थित होते.
त्यावेळी आरोपी असलम व मोबीन नदाफ या दोन्ही भावांनी सोमवारी  (दि २६)रोजी सांयकाळी १६/३० वा चे सुमारास एस जी एस हॉस्पीटल च्या ग्राऊंडवर आयोजित केलेल्या क्रिकेट व कबडडीच्या मॅचेस खेळण्याच्या कारणावरून दोन संघावरून वाद झाला होता. तो वाद मिटविण्यासाठी
यातील फिर्यादी सुरक्षा रक्षक प्रजोत पवार हे त्यांचे सहकार्यासह त्या ठिकाणी गेले व त्यांनी सदरचा वाद मिटविला त्याचा आरोपी असलम व मोबीन नदाफ या भावांना राग आल्याने त्यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचे सहकारी राहत असलेल्या त्यांच्या वैयक्तीक रूम मध्ये त्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश करून फिर्यादीला शिवीगाळ करून व चाकुचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसांमध्ये आरोपी विरोधात. रजि.नं व कलम  फर्स्ट ८९/२०२४ भादवि कलम ४५२, ५०४,५०६,३४ सह आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी  सुनावलेली आहे याप्रकरणी  शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई रोहिदास ठोंबरे व पोहेकॉ  तिकोण  हे पुढील तपास करीत आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page