अयोध्या दर्शन नर्मदा परिक्रमा करून आलेल्या रमेशगिरी महाराजांचे कोपरगावात जल्लोषात स्वागत 

अयोध्या दर्शन नर्मदा परिक्रमा करून आलेल्या रमेशगिरी महाराजांचे कोपरगावात जल्लोषात स्वागत

Rameshgiri Maharaj, who had completed Ayodhya Darshan Narmada Parikrama, was welcomed with jubilation in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed28 Feb 24, 19.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव:  येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरी महाराज हे अयोध्या प्रयागराज येथे ४० दिवस राहुन वासुदेवानंद सरस्वती आश्रमात कल्पवास अनुष्ठान करून तसेच नर्मदा परिक्रमा करून कोपरगाव मध्ये परतले. त्यांची विविध भक्त मंडळ नागरिक तरुण-तरुणी यांच्यावतीने बग्गी रथातून सवाद्य जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
  यावेळी दहा जेसीबीतून रमेश गिरी महाराजांवर फुलांची उधळण करण्यात आली. या बगगी रथाचे सारथ्य शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. स्वामी रमेश गिरी महाराज यांच्या समवेत श्री दत्त गिरी महाराज कैलास गिरी महाराज व अन्य साधुसंतगण उपस्थित होते . संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त मंडळ, व भक्तगण उपस्थित होते.
           
 येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरी महाराज यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. महासचिव चंपत राय यांनी निमंत्रण दिले येथे १८जानेवारी रोजी रमेश गिरी महाराज आयोध्याकडे प्रस्थान केले होते. महाराष्ट्र राज्यात एकूण ३५९  जणांना  आयोध्या धाम कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते, त्यात कोपरगाव तालुक्यातून मठाधिपती रमेश गिरी महाराजांचे एकमेव नाव होते. महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुका व पंचक्रोशीच्या वतीने २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे संपन्न झालेल्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी प्रतिधित्व केले होते. येवला नाका साईबाबा चौफुली मुख्य रस्त्यावरून ते थेट बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी आश्रमा पर्यंत डीजे च्या दणदणाटात सवाद्य मिरवणूक आकर्षण ठरली. यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज व स्वामी रमेश गिरी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.
                                                               रमेशगिरी महाराजांनी यावेळी तमाम राम भक्तांना आपण जशी दिवाळी साजरी करतो त्या प्रमाणे रामलल्ला चे स्वागत घरोघरी पणत्या लावून, घरावर ध्वज, पता का, आकाश कंदील लावावे व परिसरातील मंदिर सजवावे व हनुमान चालीसा पठण करावे .प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढावी, घरात गोडधोड करावं व उल्हास आनंदाच्या वातावरणात रामलल्लाचा सोहळा टीव्हीवर सर्वांनी बघावा असे आवाहन केले होते त्यानुसार कोपरगावकर यांनी अशा दिवाळीची परवणी साजरी केली होती हा सोहळा गेले ५०० वर्षापासून पाहण्यासाठी सर्वजण रामरल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची स्वागता ची वाट बघत होते. स्वामी रमेश गिरी महाराजांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांना प्रवचनाद्वारे संबोधित करून महाप्रसाद वाटण्यात आला.
 चौकट                                            छत्रपती शिवाजी स्मारकासमोर स्वामी रमेश गिरी महाराज यांचा ३५ फुटी भव्य फुलांचा हार घालून, जेसीबी फुलांची उधळण करीत शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्वागत केले. महाराजांच्या समर्थनार्थ शहरात मोठ्या प्रमाणावर स्वागताचे फलक लावण्यात आले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page