रस्ता,धुळ आणि खड्डेविरोधात ठाकरे सेना आक्रमक, दुकान साफसफाई आंदोलन
Thackeray army aggressive against road, dust and potholes, shop cleaning movement
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu29 Feb 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील मध्यवर्ती निवारा रस्त्याचे तातडीने काम व्हावे, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानातील काउंटरची मास्क लावून साफसफाई करून हे आगळे वेगळे आंदोलन केले.
गुरुवारी (दि २९) रोजी शहरातील मध्यवर्ती असलेल्या गोदावरी पेट्रोल पंप बाबा चौक ते तेरा बंगले या निवारा रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे खड्डे व धुळीवरून दुकानदार नागरिक, विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष असलेल्या सार्वजनिक बांधकाम प्रशासनाचा धिक्कार करीत एक महिन्याच्या आत या रस्त्याचे काम मार्गी लावावे यासाठी जोरदार घोषणा देत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मास्क लावून दुतर्फा असलेल्या दुकानांच्या काउंटरची साफसफाई करून आगळे वेगळे आंदोलन केले शिवसेनेच्या आक्रमक पवित्रा घेतला. ज्यावेळी आंदोलक माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांनी कोपरगाव सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी वर्क ऑर्डर प्रोसेस सुरू आहे, आपल्या आंदोलनाची दखल घेवून वरती कळवतो आणि लवकरच रस्त्याचे काम सुरू करतो असे आश्वासन दिले आहे
या काउंटर साफसफाई आंदोलनात
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा संघटक, अस्लम शेख, शहरप्रमुख सनी वाघ,माजी शहरप्रमुख भरत मोरे, उपशहरप्रमुख गगन हाडा, बालाजी गोर्डे, भुषण पाटणकर, निलेश वाणी, भैय्या वालझडे,यश मोरे,काना हाडा गौतम नंदाने, विनय टाक,गणेश भसाळे,राहुल हाडा,लोकेश हाडा,चेतन पवार,प्रीतम गैची, गजानन साखरे, गोटू महाले,पिंटू गायकवाड,जय अंभोरे, रफीक शेख आदिसह ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. ठाकरे सेनेने केलेले या आंदोलनाला पाठिंबा देत येथील व्यापारी वर्गाने आभार मानले.