कोपरगाव हद्दवाढ भागातील  दहा कोटीच्या कंत्राटदारी वरून वातावरण तापले 

कोपरगाव हद्दवाढ भागातील  दहा कोटीच्या कंत्राटदारी वरून वातावरण तापले 

The atmosphere heated up over the contract of ten crores in the Kopargaon delimitation area

आरोप : अटी व शर्तींतून होतात कंत्राट मॅनेज!Allegation: Contracts are managed through terms and conditions!

नव्या मुख्याधिकारी यांच्या समोर आव्हान The challenge before the new chief executive

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir8 March 24, 16.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : एखाद्या कामाचे कंत्राट ठराविक ठेकेदाराला द्याचया आहे किंवा त्यांना तो मिळावा म्हणून संबंधित प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न नवे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे निविदा भरण्यासाठी असलेल्या अटी व शर्ती. या अटी निश्चित करण्यासाठी अनेकदा ‘अर्थ’पूर्ण व्यवहार केले जातात.असे आरोप वेळोवेळी होत असतात अशाच प्रकारावरून कोपरगाव हद्दवाढ भागातील दहा कोटीच्या कंत्राटदारीवरून  वातावरण तापले असून अटी व शर्तींतून कंत्राट मॅनेज! करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या समोर हेच मोठे आव्हान असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे

 कोपरगाव  शहरात नव्याने समाविष्ट झालेले हद्दवाढ भागात सुमारे ९ कोटी ९४ लाख ५५ हजार ६० /-  रुपयांच्या कामासाठी  कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी  ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या. या कामी साधारण पाच निविदा आल्याचे कळते परंतु  ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्यानंतरही या निविदांमध्ये काही कागदपत्र अपूर्ण असल्याच्या तांत्रिक त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत. यामुळे कंत्राटदारांमध्ये असंतोष व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे  ज्या वेळेस ऑनलाईन निविदा मागवल्या जातात त्यावेळेस सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय पोर्टल ओपन होत नाही व प्रोसिजर पूर्ण होत नाही असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे असे असतानाही नंतर काही  तांत्रिक त्रुटी काढण्यात आल्या आहेत  याबाबत पालिकेने  त्रुटी पूर्तता करण्याबाबत कंत्राटदारांना देण्यासाठी ४ मार्च रोजी  पत्र तयार करण्यात आले असून  संबंधित कंत्राटदारांना मात्र ते पत्र  पाच मार्च रोजी सायंकाळी पाच नंतर  ईमेलवर पाठविण्यात आले व त्यात   सात मार्च  अर्थात दोन दिवसाची मुदत पूर्ततेसाठी देण्यात आल्याचा दावा कंत्राटदाराकडून करण्यात आला आहे तसे पुरावे त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहेत.   मुळात त्या त्रुटी होऊ शकत नाही असे असतानाही बाहेरच्या कंत्राटदारांना  त्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यास वेळ मिळू नये  व पर्यायाने त्यांच्या निविदा तांत्रिक त्रुटीच्या नावाखाली  रद्द करण्यात येऊन  मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्याचा   डाव असल्याचा उघड उघड आरोप काही कंत्राटदारांनी थेट मुख्याधिकारी यांच्यासमोर केला.  व अटी व शर्तींतून  कंत्राट मॅनेज करण्याचा धोका त्याच्याकडे व्यक्त केला आहे. त्यावर  मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी  याप्रकरणी सखोल  लक्ष घालण्याची ग्वाही  दिली आहे. याची चर्चा आता शहरातील  कंत्राटदार वर्तुळात सुरू आहे. 
त्यावेळी मुख्याधिकारी यांची चर्चा करताना या कंत्राटासाठी मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये कोट्यावधीची  कामे करणारे अनुभवी दमदार  कंत्राटदार आहेत. आणि आश्चर्याची बाब म्हणजे  ज्या तांत्रिक त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत त्या  हास्यास्पद  असल्याचे सांगितले विशेष म्हणजे  अट पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची संख्या मोजकीच असते. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त इतरांना हे काम मिळतच नाही. या माध्यमातून स्पर्धक कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेतून वगळण्यात येते.या सर्व बाबी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या निदर्शनास तक्रारदारांनी आणून दिल्या आहेत. 
  ठराविक कंत्राटदारांना कंत्राट मिळण्यासाठी निविदांच्या अटी तयार करण्याची नगरपालिकेत जुनी पद्धत आहे. असेही आरोप करताना  म्हटले आहे प्रामुख्याने रस्ते दुरुस्तीच्या कामात असे प्रकार आढळतात. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कंत्राटात काही मोजकेच कंत्राटदारांना कंत्राट मिळतात. तसेच इतर बाहेरच्या कंपन्यांनी निविदा भरल्या तरी त्यांना एक तर बागुलबाची भीती दाखवली जाते किंवा दमबाजी केली जाते यामुळे  त्या बाहेरच्या  कंत्राटदारांना  काम सोडून द्यावे लागते किंवा याच कंत्राटदारांबरोबर काम करावे लागते. असे प्रकार सध्या कोपरगावात सर्रास चालत असल्याची माहिती स्थानिक ठेकेदारांनी दिली आहे. ठराविक ठेकेदारांनाच काम मिळत असल्यामुळे  स्थानिक ठेकेदारांमध्ये मोठा असंतोष आहे आता नवीन मुख्याधिकारी सुहास जगताप या  सर्वाला कसे सामोरे जातात हे बघावे लागेल. अनेक वर्षापासून त्रिशंकू म्हणून वंचित असलेल्या  नव्याने शहरात समाविष्ट झालेल्या हद्दवाढ भागाला ९ कोटी ९४ लाख ५५ हजार ६० /- एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निधी आलेला आहे  ही कामे दर्जेदार व्हावी, अशी येथील नागरिकांची इच्छा आहे.  तेव्हा  योग्य कंत्राटदारालाच काम मिळावे, अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. परंतु कंत्राटदाराला सांभाळण्याच्या नादात चूक झाल्यास  त्याचा परिणाम  येणाऱ्या निवडणुकीत  नेत्यांनाच  भोगावा लागेल. याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे

चौकट

कोपरगाव शहरात मार्च महिन्यात मोठ्या धुमधडाक्यात आठ पंधरा दिवसात अनेक डांबरी रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे  अर्थात डांबरी रस्त्यावरील कमी डांबराचे पितळ  उघडे पडू नये म्हणून कमी डांबर झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच खडी वापरण्यात आली आहे. येथील नागरिकांनी तातडीने करण्यात आलेल्या या डांबरीकरण रस्त्यांची कामे दर्जेदार  व निविदेप्रमाणे झाली आहेत कींवा नाहीत याची चौकशीची व खात्री झाल्यानंतरच बील अदा करावीत अशी  मागणी नागरिकांनी केली आहे. 

तर

पंधरा दिवसातच या रस्त्यांचे पोपडे निघालेले असून खड्डे पडलेले आहेत याचा जाब  त्या त्या प्रभागातील नागरिकांनी पालिकेला व  कंत्राटदाराला विचारला पाहिजे. गेल्या महिन्याभरात  संपूर्ण शहरात झालेल्या डांबरी रस्त्यांची ऑडिट करण्याची मागणी करणार – सुज्ञ  जागरूक नागरिक

Leave a Reply

You cannot copy content of this page