गुरु शुक्राचार्य मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी…

गुरु शुक्राचार्य मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी…

Flower shower from helicopter on Guru Shukracharya temple…

दक्षिणगंगा काशी गोदातिरी कोपरगांवी महाशिवरात्र पर्वकाळ उत्साहात साजरा …. बम बम भोले च्या गजरात भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा…. 

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir8 March 24, 20.30Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगांव:- भगवान श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला दक्षिणगंगा काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीकाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव तालुक्यात महाशिवरात्रपर्वकाळ मोठया उत्साही व धार्मीक वातावरणांत पार पडला. बम बम भोलेच्या गजरात पहाटेपासूनच रांगा लावत भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी  मंदिरात गर्दी केली होती. परम सद्गुरु गुरु शुक्राचार्य मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

सायंकाळी गंगा भेटीला पालखी नेण्यात आली होती. संवत्सर येथेही शृंगेश्वर महाराजांची पालखी मिरवण्यात आली. तालुक्यातील सर्व शिवमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली होती ठिकठिकाणी साबुदाणा खिचडी केळी राजगिरा लाडू शेंगदाणा चिक्की आदी फराळाचे पदार्थ महाप्रसाद म्हणून वाटण्यात आले.
               तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण हेमाडपंथी महादेव मंदिर, तीनखणी रामदासी बाबा स्थान, विभांडक ऋषी आश्रम संवत्सर येथील शृंगेश्वर मंदिर, प्रति त्रंबकेश्वर समजल्या जाणा-या कोपरगांव बेट भागातील कचेश्वर, परम सद्गुरु गुरू शुकाचार्य, श्रीक्षेत्र मंजुर येथील येथील दत्तात्रेयरत्न शिवानंदगिरी महाराज सिध्देश्वर मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम श्री काशि विश्वनाथ महादेव मंदिर, कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर, कोपरगांव सराफ बाजारातील महादेव मंदिर, दत्तपार, स्वामी समर्थ मंदिर, श्रीक्षेत्र पुणतांबा, आदि ठिकाणी महाशिवरात्र पर्वकालानिमीत्त विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते. सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यांत आली होती. पाना-फुलांनी सर्व शिवमंदिरे सजविण्यांत आली होती. बहुसंख्य मंदिराशेजारी छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी प्रसाद, खेळणी आदि दुकाने थाटली होती त्यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते. 
         
 यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने दक्षिणकाशि गोदावरी नदीला पाणी नव्हते एरव्ही कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यामुळे पाणी असेल तेंव्हा भाविकांना स्नानाची पर्वणी साधता येत होती. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनांखाली भव्य जपानुष्ठाण पार पडले. प. पू. भाउ पाटील यांनी महादेवासह जनार्दन स्वामींची महती भक्तांना सांगितली. 
            श्रीक्षेत्र मंजुर येथे महाशिवरात्र पर्वकाळानिमीत्त दररोज सप्ताहभर किर्तन मालिका आयोजित करण्यांत आली होती याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. 
            कोपरगांव बाजारतळ परिसरात महाशिवरात्र जत्रा भरली असुन पाळणे विविध खेळण्यांचे स्टॉल उभारण्यांत आले आहे.  महात्मा गांधी चरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल साईबाबा कॉर्नर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमीत्त एक्सपो ,कृषी प्रदर्शन भरविण्यांत आले आहे. ग्रामिण भागातही तसेच जुनी गंगा परिसरात, ठिकठिकाणी नदीकाठी यात्रा भरली होती.
          महादेवाला बेल, दुग्धाभिषेक शिवामुठीचे विशेष महत्व असते त्यादृष्टीने भाविकांनी पहाट पासुनच लगबग सुरू केली होती. कोपरगांव बेट भागातील गुरू शुक्राचार्य मंदिरात विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते शुक्राचार्य मुखवटा स्थापना होवुन पंचामृत अभिषेक झाला. श्रीची पालखी छबीयाना मिरवणुक व गोदातिरी गंगाभेट सुर्यास्त आरती, षोडशपचार पुजा, मध्यरात्र महाआरती आदि धार्मीक कार्यकमांची रेलचेल होती.
सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून भगवान शंकर यांना मान असून त्यांना “महादेव” असे संबोधले जाते.   महाशिवरात्रीला शिवपूजेला विशेष महत्त्व असते पूजेसाठी सगळ्यात उत्तम हा दिवस मनाला जातो.सर्व ठिकाणी महादेवांची पूजा ही त्यांचे प्रतीक असलेल्या ‘शिवलिंग’ यांच्या स्वरूपात केली जाते. सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी होत आहे. कोपरगाव शहरात ही  महाशिवरात्रीचा उत्साह पहावयास मिळत आहे. शहरातील साईदेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक दीपक वाजे यांच्या  संकल्पनेतून महाशिवरात्री निमित्ताने बर्फापासून एक खास शिवलिंग तयार करण्यात आले होते,त्याची स्थापना बाबा चौक या ठिकाणी करण्यात आली. अमरनाथ या ठिकाणी जसे बाबा बर्फानी विराजमान होत असतात त्याच प्रमाणे कोपरगावकराना आगळ्या वेगळ्या बर्फापासून तयार केलेल्या खास शिवलिंगाचे दर्शना घेता यावे या हेतूने वाजे यांनी महाशिवरात्री निमित्ताने या खास बर्फाच्या शिवलिंगाची स्थापना केली होती. सदर  शिवलिंग स्वरूप महादेवाची दीपक वाजे यांच्यासह आकाश वाजे, विनय भगत, साईदेवा प्रतिष्ठाणचे सद्स्य, शिवभक्त, नागरिक यांनी  मनोभावे महापूजा, महाआरती करत दर्शन घेतले आहे. सदर बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठी गर्दी करत असून तालुक्यात या शिवलिंगाची चर्चा होत आहे. 

यावेळी साईदेवा प्रतिष्ठाणच्या वतीने भाविक भक्तांना साबुदाणा खिचडी, केळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.           

 चौकट                                    महाशिवरात्र पर्व काळाच्या निमित्त गंगा गोदावरीत स्नान करणे पवित्र मानले जाते, मात्र गोदावरी नदीचे अक्षरशा गटारीत रूपांतर झाले असून तेथे साचलेल्या डब्यातच काही भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली.           

Leave a Reply

You cannot copy content of this page