संवत्सरचे संपतरावभारुड यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ 

संवत्सरचे संपतरावभारुड यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ 

Dr. Babasaheb Ambedkar Samajbhushan Award to Sampatarao Bharud of Samvatsar’

 

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue12 March 24, 17.20Pm.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जमनराव भारुड यांना नुकताच सामाजिक न्याय विभागाचा सन २०१९ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुंबई येथे मान्यवरांचे हस्ते नुकताच प्रदान करण्यात आलाहा पुरस्कार संपतराव भारुड यांनी आपल्या पत्नी सौ. कौशल्याबाई  भारुड यांच्या समवेत स्वीकारला.

भारुड यांनी जवळ पास बारा तेरा वर्षे जि प सदस्यअसताना अनेक योजना गोरगरिबा पर्यंत पोहचून त्यांना सक्षम बनविण्यासाठी परिश्रम घेतले .सामाजिक न्यायहक्कासठी  लढे देऊन अनेकांना न्याय मिळवून दिलेला असून ते लाँग मार्चचे नेते  प्रा .जोगेंद्र कवाडे यांचे निकटवर्तीय असून ते त्यांच्यासारखेच दिसतात. म्हणून त्यांना प्रति प्राध्यापक जोगेंद्र कवाडे नावाने राज्यभरात प्रसिद्ध होते भारूड यांनी अनेक वंचितांच्या विकासाचे कार्य केले असुन कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वरती बोट असणाऱ्या पुतळ्यासाठी प्रा.कवाडे,व शिवाजीराव ढवळे ,व सकल आंबेडकरी समाजबरोबर घेवून अनेक समाज हितासाठी आंदोलने केली असुन मागासवर्गीय जयभीम स.पाणी वाटप सोसायटी कै.माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पुढाकाराने निर्माण करून मागासवर्गीय  शेतकरयांना पाट पाण्यासाठी नेहमी संघर्ष करत असतात. सर्वच समाजासाठी त्यांचें मोठे योगदान असून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page