महात्मा गांधींना घरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली आणि प्रशासन जागे झाले 

महात्मा गांधींना घरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली आणि प्रशासन जागे झाले 

Permission was sought to take Mahatma Gandhi home and the administration woke up

शहर विद्रूपीकरण फ्लेक्स  बोर्डचा  सुळसुळाट! City Deformation Flex Board’s Flurry!

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon11 March 24, 20.20Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव  :महापुरुषांच्या पुतळ्यांचे अवमान होणार असतील तर सदर महापुरुषांचे पुतळे घरी घेऊन जाण्याची परवानगी दयावी अशी मागणी संजय काळे यांनी प्रशासनाकडे केल्यानंतर, पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तात्काळ गांधीनगर येते धाव घेत सदर लावलेल्या फ्लेक्स महात्मा गांधी पुतळ्या समोरून हटवला आहे.                 

शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे व विनापरवाना फ्लेक्सबाजी करण्यात येऊन शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे अशातच शहरातील गांधीनगर परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोरच चक्क वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावण्यात आला होता. सदर गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. ही गोष्टी सामजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांना समजताच त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप व शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना याबाबत जाब विचारत जर असेच महापुरुषांच्या पुतळ्यांचे अवमान होणार असतील तर सदर महापुरुषांचे पुतळे घरी घेऊन जाण्याची परवानगी दयावी अशी मागणी संजय काळे यांनी प्रशासनाकडे केल्यानंतर, पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तात्काळ गांधीनगर येते धाव घेत सदर लावलेल्या फ्लेक्स महात्मा गांधी पुतळ्या समोरून हटवला आहे.                                 पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांनी  राजीनामे दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया माध्यमां समोर  संजय काळे यांनी व्यक्त करत यापुढे असे प्रकार झाल्यास मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा संजय काळे यांनी दिला आहे.
यावर आता प्रशासन काय कारवाई करते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page