पोहेगाव खडकी नदीवरील पुलास १ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर
1 crore 69 lakh rupees sanctioned for bridge over Pohegaon Khadki river
औताडे यांचा पाठपुरावा तर खा. लोखंडे यांनी दिलेला शब्द पाळला Autade’s follow-up. Lokhande kept his word
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue19 March 24, 19.20 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व देर्डे कोऱ्हाळे या या गावांना जोडणाऱ्या खडकी नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात पोहेगावग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत मंत्रालयापर्यंत पत्र व्यवहार करत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुरावाला आले असून पावणे दोन कोटीचा निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा निघून या पुलाचे काम सुरू होईल
यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.कोपरगाव राहता व निफाड तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचे काम सुरू आहे.६ कोटी ७० लाख रुपये या रस्त्याच्या कामासाठी केंद्र शासनाने दिले आहे.गेल्या अनेक वर्षापासून खडकी नदीवरील हा पूल नादुरुस्त होता. मुख्य बाजारपेठ असलेल्या पोहेगावला जाण्यासाठी तसेच शैक्षणिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना व दूध उत्पादकांना जाण्या येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती.पोहेगांवसह मढी खुर्द, मढी बु, देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड अदी गावांना याचा फटका बसत होता.सतत चार महिने पावसाळ्यात हा नादुरुस्त पूल पाण्याखाली राहत होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत जाण्यासाठी या नादुरुस्त पुलामुळे मोठी अडचण निर्माण होत होती.
तात्पुरत्या स्वरूपात पोहेगाव ग्रामपंचायतीने या पुलाचे काम पूर्ण केले होते मात्र या पुलाचा कायमचा प्रश्न निकाली लावण्यासाठी नितीनराव औताडे यांचा खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.या रस्त्याचे काम पूर्ण करण्यापासून या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द खासदार लोखंडे यांनी दिला होता.या पुलाला मंजुरी मिळाल्याने या नदीवर ४० मीटर लांबीचा भव्य फुल उभारण्यात येणार असून पोहेगांव बाजारपेठेला बळकटी व कायमस्वरूपी दळणवळणाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे परिसरातील नागरिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांचे आभार मानले आहे.
Post Views:
42