श्रीकृष्ण जन्माची कहाणी ऐकून भाविक भावुक झाले, संपूर्ण सभामंडप जयघोषाने दुमदुमून गेला.
Devotees were moved by hearing the story of Shri Krishna’s birth, the entire hall erupted in cheers.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 20 March 24, 19.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कथेच्या चौथ्या दिवशी मंगळवारी भगवान श्रीकृष्णाची जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कृष्ण जन्माची घटना सुरू होताच भाविक भावुक झाले, संपूर्ण सभामंडप “गोपाल कृष्ण भगवान की जय” ‘राधे ..राधे’ जयघोषाने दुमदुमून गेला. भाविक जयघोषात नाचू लागले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने बिपिन कोल्हे व कोल्हे परिवाराच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले असुन कथेच्या चौथ्या दिवशी मंगळवारी (दि १९) रोजी संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह ज्ञान उत्सवात श्री गोदावरी धामचे (सराला बेट) गुरुवर्य महत रामगिरी महाराज यांनी , भगवान श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रात भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला वासुदेव-देवकीच्या कारागृहात झाला. नंदबाबाच्या घरी त्यांचे पालनपोषण झाले. त्यामुळे नांदगावात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.यावेळी कथा मंडपाची भव्य सजावट करण्यात आली होती.कथेच्या वेळी फुलांची होळी खेळण्यात आली आणि भगवान श्रीकृष्णाची जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
कृष्ण जन्माची घटना सुरू होताच सभामंडपामध्ये उपस्थित भाविक “गोपाल कृष्ण भगवान की जय” ‘राधे ..राधे’ या जयघोषात नाचू लागले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी आले व विशेष म्हणजे मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या जागा कमी पडल्याने त्यांना पुरुषाच्या मंडपात बसावे लागले सायंकाळी आरती होऊन पेढयांचा प्रसाद वाटप करण्यात आला. थेट वृंदावन येथील कलाकारांनी श्रीकृष्ण जन्म कथेतील पात्र हुबेहूब साकारले मुळे सर्व वातावरण आनंदमय होऊन गेले.
या कार्यक्रमाचे यजमान बिपिन कोल्हे, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, श्रध्दा कोल्हे या त्यांच्या कुटुंबासह होते, त्यांनी मंत्रोच्चारात श्रीकृष्ण पाळणा सजवून त्यामध्ये असलेल्या बाळकृष्णाला त्यांनी झोका दिला. पूजन केले.
रामगिरी महाराज म्हणाले की,जुलमी कंसाचा वध करून श्रीकृष्णाने पृथ्वीला अत्याचारापासून मुक्त केले आणि आपल्या आई-वडिलांना तुरुंगातून मुक्त केले. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार, दुष्कृत्ये आणि पापे वाढतात तेव्हा भगवान अवतार घेतात. दडपशाहीचा अंत करून धर्माची स्थापना करण्यासाठी परमेश्वराचा अवतार आहे. माणूस या ऐहिक आकर्षणात अडकतो आणि आयुष्य बरबाद करतो. मनुष्याने आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकून भगवंतावर लक्ष केंद्रित केले तर त्याला मोक्ष प्राप्त होतो.
Post Views:
38