कोरोना : कोपरगावात शुक्रवारी दिवसभरात कैद्यासह १५ नव्या रुग्णांचा समावेश

कोरोना : कोपरगावात शुक्रवारी दिवसभरात कैद्यासह १५ नव्या रुग्णांचा समावेश

वृत्तवेध ऑनलाईन 31 July 2020
By: Rajendra Salkar,18.00

कोपरगाव : शुक्रवारी दुपारी १७४ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात १२ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी नगरला पाठविलेल्या १० जणांच्या अहवालापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

१५ पॉझिटिव्ह रुग्णात ५ कैदी असून कोळपेवाडी १, इंदिरानगर १ रुग्ण, स्वामी समर्थ नगर १ रुग्ण, गांधिनगर २, समता नगर १, गोरोबा मंदिर गोदावरी नगर १ राम मंदिर रोड १, लक्ष्मीनगर १, व सुरेगाव १ यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, गुरूवारी (३१जुलै) रोजी दुपारी कोपरगाव शहर सबजेल मध्ये कल्याणला सर्दी-पडसे झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सबजेलमधील ६१ कैदी व ७ गार्ड पोलिसांची अशा ६८ जणांचे नमुने रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात ५ कैदी एॅक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित ६३ अहवाल निगेटिव्ह आले असे त्यांनी सांगितले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page