कोपरगाव सबजेल हादरले : पाच कैद्यांना कोरोनाची बाधा, ६३ निगेटिव्ह
६१ कैदी आणि ७ गार्ड अशा ६८ जणांची रॅपिड ऐण्टीजन चाचणी करण्यात आली.
वृत्तवेध ऑनलाईन । 31 July 2020
By: Rajendra Salkar,17 : 25
कोपरगाव : कोपरगाव सबजेल मधील कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी ६१ कैदी आणि ७ गार्ड अशा ६८ जणांची रॅपिड ऐण्टीजन चाचणी करण्यात आली. ज्यात पाच कैदी संक्रमित झाल्याचे आढळून आले आहे. अशी माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
जेल अधीक्षक तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले की, श्रीरामपूरचे वर्ग केलेले चार कैदी व शहर पोलीस स्टेशन कोपरगाव यांनी मालेगाव येथून आणलेला एक कैदी असे पाच कैदी यांना कोरोना लागण झाल्याचे ननिष्पन्न झाल्याने शुक्रवारी ३१ जुलै रोजी कोपरगाव सबजेलमधील ६१ कैदी आणि ७ गार्ड अशा ६८ जणांची रॅपिड ऐण्टीजन चाचणी करण्यात आली. यात पाच कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर ६३ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या पाच कैद्यांना स्वतंत्र बराकी क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोपरगाव पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
बराकीत असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने तुरुंग प्रशासन व पोलिस वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक दुय्यम कारागृहा ला तहसीलदार योगेश चंद्रे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर तालुका आरोग्य अधिकारी संतोष डॉक्टर संतोष विधाटे, शिर्डी लोणी राहाता कोपरगाव शहर व ग्रामीण च्या पोलीस निरीक्षकांनी भेट दिली गार्ड अंमलदार सुभाष आव्हाड ए. एस. गुंजाळ पी.सी. कुंडारे यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली दरम्यान या प्रकरणाचा सर्व अहवाल कारागृह निरीक्षक पुणे जिल्हाधिकारी नगर कोपरगावचे न्यायाधीश तहसीलदार आदींना पाठवण्यात आला आहे
चौकट
कोपरगाव तालुक्यातील दुय्यम कारागृह नेहमीच चर्चेत असते येथे राहाता लोणी बाभळेश्वर शिर्डी व कोपरगाव तालुक्यातील कैदी आणून ठेवले जातात. येथील चार बराकीची संख्या असून केवळ वीस कैदी क्षमता असतांना त्याठिकाणी ६० ते ८० कैदी जनांवराप्रमाणे सारखे कोंबले जाते, याबाबत सातत्याने आवाज उठवूनही कारागृह प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना लागण झाल्यामुळे आता बराकीची स्वच्छता पावडर फवारणी करण्यात आली आहे.