लोकसभा निवडणूक मतदान दिवशी सोमवारी कोपरगावचा आठवडे बाजार बंद- सुहास जगताप 

लोकसभा निवडणूक मतदान दिवशी सोमवारी कोपरगावचा आठवडे बाजार बंद- सुहास जगताप 

Weeks market of Kopargaon closed on Monday on Lok Sabha election polling day- Suhas Jagtap

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 19.50 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : शिर्डी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या १३ मे रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी सोमवारी भरणारा कोपरगावचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.

शहरातील आठवडे बाजारातील भाजी, फळ, किराणा, रेडीमेड, कापडे व इतर अनुषंगिक व्यापारी यांना कळविण्यात येते की, ३८-शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये सोमवार दि.१३ मे  रोजी मतदान होणार आहे. सदर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने मुंबई मार्केट  अण्ड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सोमवारी  कोपरगावचा  आठवडे बाजार १३ मे रोजी बंद राहणार आहे.
या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.याची सर्व आठवडेबाजार विक्रेते यांनी नोंद घ्यावी असे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page