श्रीगणेश कारखान्यालाजिल्हा बँकेचे ४० कोटी मंजूर; पण दिले जात नाही 

श्रीगणेश कारखान्यालाजिल्हा बँकेचे ४० कोटी मंजूर; पण दिले जात नाही 

40 crore sanctioned by District Bank to Sriganesh Factory; But it is not given

अध्यक्ष श्री लहारे व उपाध्यक्ष श्री दंडवते यांची फडणवीसांकडे गा-हाणे President Mr. Lahare and Vice President Mr. Dandavate visited the Fadnavis

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 19.40 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगांव : हंगामातील ऊस गाळपा पोटी शेतकरी आणि कामगारांना पैसे देण्यासाठी अहमदनगर जिल्हा बँकेने ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु ते दिले जात नसल्याची तक्रार श्री गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. या आर्थीक अडचणींतून सोडवणुक करावी असे निवेदन त्यांनी दिले आहे. 

गुरुवारी प्रचार सभेसाठी देवेंद्र फडणवीस कोपरगाव आले होते

  दिलेल्या निवेदनात  श्री लहारे व श्री दंडवते या  व्दयीनी म्हटले आहे की, चालु गळीत हंगामात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने या परिसरातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचा उस गाळप करण्यांत आला.  या शेतकऱ्यांचे व कामगारांचे देणे अद्यापही बाकी आहे,  त्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडे कर्ज मागणी केली त्यांनी चाळीस कोटींचे कर्ज मंजूर केले. मात्र अद्याप पर्यंत ते दिले जात नाही विशेष म्हणजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आपल्याच पक्षाचे असल्याची खंत अध्यक्ष  लहारे व उपाध्यक्ष  दंडवते यांनी  व्यक्त केली.
श्री लहारे व श्री दंडवते यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्हा बँकेचे संचालक विवेक  यांनी परिसरातील शेतक-यांच्या अडीअडचणी समजुन घेत गणेश कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर घडवुन आणले. तेंव्हापासुन ते आजपर्यंत गणेश कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनांस विरोधकांकडुन सातत्यांने सापत्न वागणुक देवुन आर्थीक कोंडी करण्यांचे काम केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी भेट घेत ही वस्तुस्थिती  अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी त्यांच्या निदर्शनास आणली .
   

Leave a Reply

You cannot copy content of this page