महात्मा बसवेश्वरांचे विचार व वचने स्विकारली पाहिजेत – प्रकाश साबरे

महात्मा बसवेश्वरांचे विचार व वचने स्विकारली पाहिजेत – प्रकाश साबरे

Thoughts and promises of Mahatma Basaveshwar should be accepted – Prakash Sabre

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 20.10 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : महात्मा बसवेश्वरांनी  यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा,चालीरीती यांना विरोध करून धार्मिकतेबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक प्रगतीचा मूलमंत्र, विचार, वचने  यांची आज ही समाजाला गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने ती स्वीकारली पाहिजे. असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी केले.

     कोपरगाव शहरातील निवारा परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या ८९३ व्या जयंतीनिमित्त कशिदा निवासस्थानाजवळ महात्मा बसवेश्वर यांच्या वचन स्तंभाचे लोकार्पण लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

    ते पुढे म्हणाले की, लिंगायत समाजाचे नेते काका कोयटे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य हे महात्मा बसवेश्वरांच्या विचारांशी सांगड घालणारे आहे. त्यांनी बसवेश्वरांच्या विचारांचे व वचनांचे आचरण करून शून्यातून विश्व निर्माण केले. तसेच समाजातील तळागाळातील बांधवांनाही बसवेश्वरांच्या विचारांच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. 
    तालुक्यातील कुंभारी येथे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांचा सत्कार लिंगायत समाजाचे नेते काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लिंगायत समाजातील ललित निळकंठ यांची कुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व आरव निळकंठ याचा प्रकाश साबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लहान वयात आरव निळकंठ याने महात्मा बसवेश्वरांविषयीची माहिती मनोगतातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लिंगायत संघर्ष समिती युवा अध्यक्ष प्रदीप साखरे यांनी केले. या वेळी लिंगायत संघर्ष समिती समन्वयक काका कोयटे, कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष अमोल राजुरकर,  माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, गोपीनाथ निळकंठ, भालचंद्र विभुते, संदीप कोयटे, सतीश निळकंठ, वाल्मीक निळकंठ, अतुल निळकंठ, श्याम जंगम, बाबासाहेब जंगम, नितीन भुसारे, गिरीश सोनेकर, अमोल साखरे, दीपक हिंगमिरे, दिलीप घोडके, प्रकाश घोडके,दिगंबर भुसारे, दिगंबर लोहारकर, सौ.छाया सोनेकर, सौ.कल्पना हिंगमिरे, सौ.मंगल साखरे, सौ.उज्वला सरडे आदींसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका लिंगायत महिला मंडळ अध्यक्षा सौ.प्रीती साखरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page