कोपरगावात जगतज्योती, महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
Jagatjyoti,MahatmaBasaveshwar Jayanti celebrations in Kopargaon
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 11 May , 20.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : लिंगायत धर्माचेसंस्थापक जगतज्योती, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज तहसील कार्यालय येथे भक्तीयुक्त वातावरणात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, प्रदीप साखरे,भालचंद्र विभुते, सतीश निळकंठ यांच्यासह भाविक भक्तगण उपस्थित होते. यावेळी महात्मा बसवेश्वर यांची आरती करण्यात येऊन उपस्थितांनी दर्शन घेतले. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची माहिती यावेळी सांगण्यात आली.
लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. समतावादी विचारांचा प्रसार करुन क्रांती घडविणारे थोर संत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदींसह लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.
Post Views:
58