कोपरगावमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
65 percent polling till 6 pm in Kopargaon; Spontaneous reply from MPs
कुठेही अनुचित प्रकार घडला नाही मतदान शांततेत No untoward incident happened anywhere, the voting was peaceful
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 13 May , 20.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू दिलेल्या दहा वाजे नंतर चांगला वेग घेतला कडक ऊन असतानाही मतदानाचा वेग वाढतच होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के, मतदान नोंदवले गेले अशी माहिती कोपरगाव विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली.
शिर्डीमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी शहरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. वंचितच्या ऊत्कर्षा रुपवते यांनी त्यांच्या अकोले शहरातील केंद्रावर हक्क बजावला.
माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या निवडणूक केंद्रात आ.आशुतोष काळे माजी आमदार अशोक काळे, सौ. पुष्पाताई काळे, सौ.चैताली काळे, अभिषेक काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हेवस्ती शाळा मतदान केंद्र ४७ येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, ईशान कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नितीनदादा कोल्हे, कलावतीताई कोल्हे,अमित कोल्हे, मनाली कोल्हे, सुमित कोल्हे, दत्तू नाना कोल्हे अशा संपूर्ण कोल्हे परिवाराने मतदानाचा हक्क बजावला
दोन तासाच्या टप्प्यानंतर मतदानाची आकडेवारी
सकाळी नऊ वाजेपर्यंत कोपरगाव येथे
५.११, टक्के मतदान नोंदवले गेले.
सकाळी ११ वाजेपर्यंत कोपरगाव येथे १९ टक्के मतदान नोंदवले गेले.
दुपारी १ वाजेपर्यंत कोपरगाव येथे ३२.८५ टक्के, मतदान नोंदवले गेले.
दुपारी ३ वाजेपर्यंत कोपरगाव येथे ४४.८७ टक्के, मतदान नोंदवले गेले
दुपारी ५ वाजेपर्यंत कोपरगाव येथे ५२.९२ टक्के, मतदान नोंदवले गेले एकुण मतदान १,४७,९७० यात पुरुष ८०३९८, स्त्री ६७५७२ यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोपरगाव येथे सरासरी ६५ टक्के, मतदान नोंदवले गेले. मतदानाची सखोल आकडेवारी येणे बाकी होते. त्यामुळे एकूण झालेले मतदान स्त्री व पुरुष यांनी बजावलेला मतदानाची आकडेवारी समजू शकलो नाही.
सोमवारी(१३मे) रोजी मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी रवंदा मतदान केंद्र ९ व ब्राह्मणगाव मतदान केंद्र ४३ या ठिकाणी व्हिव्हीपॅट बंद पडले होते
तर दुपारी मोर्विस केंद्र १७ व संवत्सर येथील बिरोबा चौकातील मतदान केंद्र ७५ नंबर मतदान केंद्रावर व्हिव्हीपॅट अर्धा तास बंद पडले. अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली.
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख ७९ हजार ९४० इतके असून यात पुरुष एक लाख ४२ हजार १४८ तर स्त्रिया एक लाख ३७ हजार ४५५ व इतर सहा असे असून नोकरदार मतदान ३३१ इतके आहे. २७२ मतदान केंद्रावर होत असलेले या निवडणुकीसाठी ३२६ ए व्ही एम मशीन ठेवण्यात आले होते २७२ मतदान केंद्रात तीन आदर्श मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी १४९५ शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तर सुरक्षेसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह साडेतीनशे पोलीस यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्वांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी २७ बस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. अशी माहिती सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली.
कोपरगाव शहरांमध्ये नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यासह शहरातील कामकाजावर लक्ष ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी यांना मदत करत होते.
नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणी मंडप घालण्यात आले होते. पण त्या ठिकाणी बसण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते, अशी स्थिती दिसून आली. अनेकांना मतदानाच्या स्लीप या मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे आपले केंद्र कोठे आहे आणि आपले मतदार यादीत नाव आहे की नाही याबाबतही गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांची मतदार यादीतून नावे गायब होती तर काहींना मृत घोषित करण्यात आले होते मतदान केंद्राच्या आवारामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे कोणालाही आत मध्ये मोबाईल नेता आला नाही. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
यावेळीची निवडणूक सगळ्याच अर्थाने वेगळ्या पद्धतीची होती गेली २५ ते ३० वर्षे एकमेकांच्या विरोधात काम करणारे काळे, कोल्हे, विखे, परजणे औताडे या विरोधकांचे कार्यकर्ते महायुतीमुळे एकाच मंडपात मतदारांना दिसत होते. तर तिकडे उध्दव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेस कार्यकर्ते एकाच मंडपात दिसत होते. विळ्या भोपळ्याचे नाते असलेले स्थानिक नेते एकत्र आले परंतु त्यामुळे अनेक कार्यकर्ते व मतदारांची कुचंबना होत होती.
युती व आघाडीमध्ये पक्षांचे विलनीकरण झाल्यामुळे एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले कार्यकर्तेच एकत्र आल्याने त्या कार्यकर्त्यात फारसा उत्साह व जोश दिसून येत नव्हता त्यामानाने मतदारात प्रचंड उत्साह दिसून येत होता मतदारांमध्ये उमेदवारापेक्षा कोणी मोदीसाठी तर कोणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मतदान करण्याची भाषा करताना दिसत होते पहिल्यांदाच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात कडक ऊन असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता तो सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सातत्याने टिकून होता.
शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे
चौकट
कोपरगावमध्ये सर्व गटतट विसरून एकत्र आलेल्या व तुटपुंज्या साहित्यावर लढणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकात प्रचंड उत्साह दिसून येत होता.सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उमेदवार सदाशिव लोखंडे कन्या विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर आले असताना येथील शिवसैनिकांनी मशाल…. मशाल अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने लोखंडे यांनी काढता पाय घेतला.
चौकट
समता जलपान सेवा (१९मतदान केंद्रांवर) मतदानाचा टक्का वाढावा तसेच देशाची लोकशाही बळकट व्हावी या हेतूने स्तुत्य उपक्रम समता पतसंस्था, समता चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने शहरात मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर जलपान सेवा
Post Views:
71