माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Former MLA Snehalata Kolhe exercised her right to vote with her family
लोकशाही समृद्ध व सुदृढ करावी -सौ. स्नेहलता कोल्हेDemocracy should be enriched and strengthened – Mrs. Snehlata Kohle
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon13 May , 20.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव विधानसभेच्या पहिल्या महिला माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील येसगाव कोल्हे वस्ती शाळा येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोल्हे वस्ती शाळा येथील बुथ क्रमांक ४७ वर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सासुबाई सिंधुताई उर्फ माई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सौ रेणुका कोल्हे, ईशान कोल्हे, सौ श्रद्धा कोल्हे, नितीनदादा कोल्हे, कलावतीताई कोल्हे,अमित कोल्हे, सौ मनाली कोल्हे, सुमित कोल्हे, सौ निकिता कोल्हे , दत्तूनाना कोल्हे या संपूर्ण कोल्हे परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गट विरूध्द शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) यांच्यात कडवी झुंज आहे. शिंदे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रचंड मेहनत घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर स्नेहलता कोल्हे यांनी मतदारसंघातील गावा- गावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांमार्फत प्रचार मोहिम राबवली. विखे कोल्हे यांच्यातील नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्यानंतर कोल्हे यांनी थेट प्रचारात उडी घेतल्यामुळे व त्यांच्या अचूक नियोजनामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून येत होते.
आज १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोल्हे वस्ती शाळा येथे सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर सौ स्नेहलता कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
कोट
सर्वांनी मतदान करून आपल्या देशाची लोकशाही समृद्ध व सुदृढ करावी – स्नेहलता कोल्हे
यावेळी बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की , महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील कोल्हे वस्ती शाळा येथील ४७ बुथवर माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी मतदान करून आपल्या देशाची लोकशाही समृद्ध व सुदृढ करावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
Post Views:
54