शिर्डीत बाजी कोण मारणार? ; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांतही उत्सुकता

शिर्डीत बाजी कोण मारणार? ; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांतही उत्सुकता

Who will beat Shirdi Baji? ; Curiosity among activists, officials and citizens

निकाल नव्हे अंदाज Estimates not results

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed15 May , 16.30 Pm.By सालकर राजेंद्र

 कोपरगाव  : संपूर्ण राज्यात लक्षवेधी  ठरलेल्या शिर्डी लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालास तीन आठवडेचा अवधी असला तरी मतदानाची आकडेवारी व तज्ज्ञांची मते जाणून घेऊन निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. निवडून कोण येणार, यावरून गावोगावी पैजा लागल्या आहेत. यात नागरिकांसह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे , महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात जोरदार लढत झाल्याचे वाटत असले तरी वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रूपवते यांच्या एंट्रीने  निवडणुकीत  ट्विस्ट आणला . त्यामुळे यंदाची शिर्डी लोकसभा निवडून राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजली. एकास एक लढतीचे चित्र बदलून ही निवडणूक तिरंगी होईपर्यंत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या.  राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, पदयात्रांच्या माध्यमातून रान पेटविले. मतदानाची प्रक्रिया सोमवारी पार पडल्यानंतर रात्रीपासून निकालाचे अंदाज व्यक्त होऊ लागले.
असा लावला जातोय अंदाज –  दोन्ही उमेदवारांना जनता कंटाळलेली असल्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मतदारांनीवंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांना पसंती दिली. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नाराजी,
पंतप्रधान म्हणून  नरेंद्र मोदीच हवेत, भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे  यांच्या उमेदवाराला सहानुभूती मिळणार, मनापासून नसले तरी तांत्रिक दृष्ट्या युती धर्माच्या नावाखाली काळे, कोल्हे, विखे, परजणे,औताडे काका कोयटे, हे सर्वच एका बाजूला असल्याने याचा आयता फायदा लोखंडेना  होणार,   निष्ठावान शिवसैनिकांनी  पुंजा साहित्यवर खिंड लढविण्याचा प्रयत्न केला .जनतेने निवडणूक हातात घेतली या नावाखाली दोन्ही उमेदवारांनी  हात आखडता घेतला अर्थात याची किंमत मतदानाचा टक्का घसरण्यात झाली हे नाकारता येणार नाही
  भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे नियोजनाचा अभाव असल्याने त्यांना याचा मोठा तोटा होऊ शकतो, वंचितच्या उत्कर्षा रूपवते भाऊसाहेब वाकचौरे यांची मते खाणार का ?  फतवा निघाल्यामुळे मुस्लिमांची १००% मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना पडणार का ?  , लोखंडे आणि वाकचौरे एका समाजाचे असल्यामुळे त्यांच्यात मताची विभागणी होणार आहे,  शिवसेना  विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्याने शिवसेनेच्या मताची विभागणी होणार आहे. सुशिक्षित मतदारांनी मोदींना पसंती दिली तर दुसरीकडे सहानुभूती म्हणून  उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितले जात होते त्यामुळे जास्त मतदान कोणत्या मुद्द्यावर झाले त्यावरच सदाशिव लोखंडे विजयाची हॅट्रिक मारणार की भाऊसाहेब वाकचौरे पराभवाची हॅट्रिक करणार का? 

विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान, १०लाख ५७ हजार २९८

टक्का घसरला पण मतदान २० हजाराने वाढले

अकोले एक लाख ५५  हजार ९३० (५९.८२%) संगमनेर एक लाख ८४ हजार ३१ (६५.७७%), शिर्डी एक लाख ७८ हजार ७१६ (६३.७७%), कोपरगाव एक लाख ७१ हजार ५९ (६१.१८%), श्रीरामपूर एक लाख ९३ हजार ६०५ (६४.०८%) नेवासा एक लाख ७३ हजार ९५७ (६३.२९%)असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण मतदान दहा लाख ५७ हजार २९८ (६१.१८%) इतके झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३० हजार पाचशे दोन (६४. ९३%) मतदान झाले होते. सन २०२४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का ३.७५ टक्क्यांनी घसरला असला तरी मतदानामध्ये मात्र २० हजार मतांची वाढ दिसते.

२०१९ च्या निवडणुकीत

शिवसेना भाजपचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ४ लाख ८६  हजार ८२०  (४७.२९%) टक्के मतदान झाले होते तर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना तीन लाख ६६ हजार ६२५ (३५.६२%) मतदान झाले होते तर वंचितचे सुखदान यांना ६३ हजार २८७(६.१५ %) मतदान झाले होते सव्वा लाख मतांनी शिवसेना-भाजप युतीचे सदाशिव लोखंडे  दुसऱ्यांदा विजय झाले होते
२०२४ मध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे व महाआघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचित आघाडीच्या उत्कर्षा रूप होते यांच्यात तिरंगी लढत होत आहे मागील मतदानाची तुलना,   मतदानाचा टक्का ( ३.७५ %)ने घसरला असला तरी  एकून मतात २० हजार मतांची वाढ झालेली आहे.

अकोले, शिर्डी, कोपरगाव यापेक्षा मुस्लिम बहुल श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा विधानसभा संघात ४५ हजार जादा मतदान

 
मुस्लिम बहुल असलेल्या श्रीरामपूर १ लाख ९३ हजार ६०५ संगमनेर १ लाख ८४ हजार ३१ नेवासा एक लाख ७३ हजार ९५७ असे एकूण पाच लाख ५१ हजार ५९३ इतके मतदान झाले आहे. तर अकोले एक लाख ५५ हजार ९३०, शिर्डी एक लाख ७८ हजार ७१६ व कोपरगाव एक लाख ७१ हजार ५९ असे एकूण पाच लाख पाच हजार सातशे पाच इतके मतदान झालेले आहे मुस्लिम बहुल आणि सर्वसाधारण विधानसभा मतदारसंघाची तुलना करता मुस्लिम बाहूल श्रीरामपूर संगमनेर व नेवासा या ठिकाणी ४५ हजार मतदान जादा झाले आहे.
सहा मतदारसंघात एकूण मतदान दहा लाख ५७ हजार २९८,   (६१.१८%) इतके झाले आहे
 झालेल्या एकूण मतांची प्राप्त माहितीनुसार( अंदाजे) जात निहाय मतदानाची तुलना करता  यात दहा टक्के मुस्लिम मतदान एक लाख ५१ हजार २९५ इतके आहेत अनुसूचित जाती एक लाख ८९ हजार १४ (13%) टक्के अनुसूचित जमाती एक लाख ९९ हजार ५८६ (१४%) मुस्लिम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर असे एकूण पाच लाख ३९ हजार ८९८ अंदाजे मतदान होते तर उर्वरित सर्व मिळून पाच लाख १७ हजार ४०० इतके मतदान होते.  आकडेवारी आपल्यासमोर मांडली आहे  आता कोण विजयी होणार? कोणाचा पराभव होणार?  याचे गणीत हे आपल्याला (जनतेलाच) ठरवायचे आहे
 आजपर्यंत झालेल्या निवडणुका या पक्षाच्या आधारे होत होत्या नेत्याबरोबर कार्यकर्त्यांचाही कस लागत होता मात्र यावेळेस महायुती व महाआघाडीयामध्ये सर्व मोठमोठाले  (विळ्या भोपळ्याचे  नाते) पक्ष एकत्र आले. त्यात हि निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी असल्याने  या निवडणुकीला विधानसभेची रंगीत तालीमही म्हणता येणार नाही तसेही  दोन्ही शिवसेनेचे चिन्ह मिरविण्याची फारशी कोणाला हौसही नव्हती.  त्यामुळे कडक उन्हातही निवडणूक  थंडे… थंडे …. कुल….कुल अशीच राहिली

 शिर्डी मतदार संघातील दिग्गज

विधानसभा मतदार संघ निहाय विचार करता शिर्डी मतदार संघात महायुतीचे ना. राधाकृष्ण विखे, वैभव पिचड व आ. डॉ. किरण लहामटे, आ आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, गोदावरी दूध संघाचे राजेश  परजणे,  शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे,  महाआघाडीचे  बाळासाहेब थोरात,  माजी मंत्री शंकरराव गडाख आमदार लहू कानडे असे दिग्गज होते.
 

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांचा मूड मोदी का ठाकरे असाच राहिला

ही निवडणूक  महायुती व महाआघाडी अशी असली तरी या   निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसल्याने मतदारांचा मूड थेट मोदी किंवा थेट ठाकरे असाच राहिला एकूणच महायुती महाआघाडीपेक्षा मतांचे विभाजन मोदी आणि ठाकरे असेच झाल्याचा अंदाज आहे
या निवडणुकीत मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न, राम मंदिर 370 कलम, हे  मुद्दे प्रभाव पाडू शकले नाही मात्र मतदानात मुस्लिम मतदारांना आलेला फतवा प्रभावी ठरल्याचा दिसून येते त्यामुळे या सर्वाकडे  मतदार कशा पद्धतीने बघतात व त्यांनी कसे मतदान केले हे मात्र निकालानंतर समजेल आज  हाच उमेदवार निवडून येईल ? हे म्हणणे धाडसाचे होईल  उत्कर्षा रूपवते यांना  किती मते मिळतात ? त्या मतांचा कोणावर परिणाम होणार ? शिवसेना-भाजप युतीतून सदाशिव लोखंडे दोनदा विजयी झाले आता ते महायुतीत आहेत तर भाऊसाहेब वाकचौरे एकदा महायुतीतून निवडून आले होते नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आघाडीतून  त्यांचा पराभव झाला होता झाला आज ते महाआघाडीत आहेत मागच्या वेळेस वंचित बहुजन  आघाडीचे उमेदवाराला ६३  हजार मते मिळाली होती. यावेळेस शत प्रतिशत मुस्लिम मते उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे अर्थात ही मुस्लिम मते वाकचौरे यांचे बलस्थान ठरू शकतात परंतु शिवसेनेचे धनुष्यबाण लोकांच्या डोक्यात आहे त्यामुळे मशाल चिन्ह किती लोकांपर्यंत पोहोचले हाही संशोधनाचा भाग आहे दोन पाच टक्के मते इकडे तिकडे झाली तर वाकचौरे यांचे पाच सहा हजार  मतांचे नुकसान होऊ शकते त्यात  काँग्रेसच्या राज्य पदाधिकारी राहिलेल्या सध्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते याही बऱ्यापैकी मुस्लिम  मताची  साठमारी करू शकतात  त्यात दलित मतांचा मोठा  ओढा त्यांच्याकडे असल्याचे दिसून येते  बरीसभर दोघांपेक्षा तिसरा बरा याही गोष्टीचा फायदा उत्कर्षा रूपवते यांना होऊ शकतो त्यामुळे नक्कीच त्या विजयात अडसर ठरू शकतात तसेच अपक्ष राहिलेले इतर उमेदवारांना    ५० ते ६० हजारापेक्षा जादा मतदान  पडण्याची शक्यता नाकरता येत नाही  मतदानाचे इतके विभाजन पाहिल्यानंतर एक मात्र निश्चित  जो काही निकाल लागेल  त्या  विजयी निकालावर  वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांचा प्रभाव  दिसेल हे सत्य नाकारता येणार नाही दोन्ही उमेदवाराबद्दल असलेली नाराजी यामुळे मतदारांनी जर काही वेगळा विचार केला असेल तर आणि तसा जर काही चमत्कार घडलाच तर उत्कर्षा रूपवते यांना संधी मिळेल का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतपेटीत बंद झालेली आहेत एक मात्र खरे की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ४  जुनचा निकाल हा विधानसभेची समीकरणे बदलणारा ठरणार असून भविष्यातील निवडणुकांची नांदी ठरणारा असेल  यात तिळमात्र शंका नाही
आकडेवारीबाबत तज्ज्ञांचे मताच्या आधारे निकालाचा अंदाज बांधला जात आहे. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून कानोसा घेत तसेच कोणता गट कोणासोबत राहिला या आधारेही  शिर्डी लोकसभेचा एकत्रित अंदाज बांधला  आहे. सर्वजण निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page