कोपरगावमध्ये छ. संभाजी महाराज जन्मोत्सव समिती वतीने छ. संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
Ch in Kopargaon. On behalf of the Sambhaji Maharaj Janmotsav Committee Ch. Sambhaji Maharaj birth anniversary celebration
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu16 May , 20.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : छत्रपती संभाजी महाराज यांची 360 वी जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२४ मंगळवार दिनांक १४ मे २०२४ रोजीसकाळी ७.३० वा,धर्मवीर राजमाता जिजाऊ माँ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे. सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांची पुजा,अभिषेक सोहळा, सायं. ६.३० वा. संत-महंत पुजन तसेच प्रमुख अतिथी स्वागत. रमेश गिरी महाराज रामगिरी महाराज, राघवेश्वरानंदगिरी महाराज, शिवगिरी महाराज, गोवर्धन गिरी महाराज कैलास नंदगिरी महाराज या संतांचे संत पूजन करण्यात आले
सायं. ७.०० वा. छत्रपती संभाजी महाराज चौकात युवाशाहीर श्रीकांत शिर्के प्रस्तुत गाथा राष्ट्रगौरवाची कार्यक्रम ,रात्री ९.०० वा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव जल्लोष व अतिषबाजी सोहळा आयोजित करण्यात आला होता पावसाने हजेरी लावली असतानाही शिवप्रेमी व पंचक्रोशीतील व शहरातील नागरिकांनी भर पावसात कार्यक्रमाचा आनंद घेतला व या ऐतिहासिक कार्यक्रमाची शोभा वाढवली छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्स्व समिती वतीने सर्वांचे शिवप्रेमींचे आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी समितीच्या वतीने केलेल्या कार्याची माहिती देताना ११ में २०२१ रोजी वीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समीती च्या रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये ६७ रक्तदात्यानी रक्तदान केले. गरीब विद्यार्थीना
शालेय वस्तु, तसेच खाऊ वाटप केले होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महराजांच्या
राज्याभिषेक दिनानिमित भव्य राज्याभिषेक सोहळा कोपरगांव येथे छत्रपती संभाजी
महाराज यांच्या स्मारक येथे सर्व साधु संत, महिला, पुरूष, अधिकारी, सामाजिक
सेवक आणि समितीच्या सदस्याच्या उपस्तितीत पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कोपरगांव शहरात
रामेशगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत
१४० जोडप्यांच्या हस्ते महाआरती, चाळीसगाव येथील श्री साई गाव पालखीच्या साई भक्तांची निवास व महाप्रसादाची सोय करण्यात आली,कोपरगांव नगरपालिकेला समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरण करण्यासाठी निवेदनास नगरपालिकेची मंजूर करून को.न.पा. सुशोभिकासासाठी १० लाख रु ठराव पास करून घेण्यात आला आहे आणि लवकरच काम चालू होईल. सूर्यतज संस्थे मार्फत कोपरगांव येथे छ. संभाजी महाराज जन्मोत्सव समीती अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक आणि सांस्कृतिक पुरस्कार मिळाला. छ. संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने गुजरपूर येथे शंभुशौर्य पुरस्कार मिळाला छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी २१ जोडप्यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व पूजा सायंकाळी व्याख्याते
ह.भ. प. सोपानदादा कनोरकर महाराज अमरावतीकर यांचे छत्रपती संभाजीआणि कीर्तन सोहळा पार पडला, हभप अवधुत
गांधी महाराज प्रस्तुत भक्ती शक्ती संगमाचा कार्यक्रम,साहित्य वाटप. असे विविध कार्यक्रमा आजपर्यंत समितीच्या वतीने घेण्यात आले असल्याची माहिती वतीने देण्यात आली.
Post Views:
48