नासिक शिक्षक मतदार संघातून विवेक कोल्हे निवडणूक लढविणार
Vivek Kolhe will contest from Nashik Teacher Constituency
विवेक कोल्हे यांचा निर्णय दूरगामी; मात्र कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता करणाराVivek Kolhe’s decision far-reaching; But unsettling among activists
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun19 May , 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नासिक शिक्षक मतदार संघात उमेदवारी करण्याचा मोठा निर्णय आज भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी घेतला आहे यंत्रणा कामाला लागलेली असून विवेक कोल्हे यांचा निर्णय दूरगामी ठरणारा असे जाणकारांचे मत मात्र कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता सध्या कोपरगावच्या राजकीय वर्तुळात याचीच मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर
विधान परिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत ७ जुलै २०२४ ला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे आहे तर, मतदानाची तारीख १० जून आहे. १३ जूनला मतमोजणी होईल.
मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे तर मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत ७ जुलैला संपत आहे.
त्यामुळे या निवडणुकीची घोषणा झाली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच या चार विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे.
१५ मे ला निवडणुकीचे नोटीफीकेशन निघेल. त्यानंतर २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. २७ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर १० जूनला सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. १३ जूनला मतमोजणी केली जाईल. १८ जूनला निवडणूक प्रक्रीया पुर्ण केली जाईल.
मुंबई पदवीधर या शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अनिल परब, वरुण सरदेसाई ही नावे चर्चेत आहेत.तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले लोकभारतीचे कपिल पाटील यांनी आता लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. याऐवजी लोकभारतीने सुभाष मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर हा पारंपारिक भाजपचा मतदारसंघ मानला जातो. भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे यांना उमेदवारी मिळणार आहे.
नाशिक शिक्षकचे आ किशोर दराडे यांनी शिवसेनेला साथ दिली. पक्षातील फुटीनंतर दराडे बंधू हे ठाकरे गटाबरोबर कायम असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. इकडे कोल्हे यांचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. कोल्हे यांच्याकडे शैक्षणिक संस्था असून नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचा चांगला संपर्क प्रभाव आहे संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब थोरात याचेबरोबर तसेच रयत शिक्षण संस्थेतही कोल्हे यांचा चांगलं दबदबा आहे. विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदार संघात निवडणूक लढत असतील तर आमदार आशुतोष काळे यांचा देखील त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे या मतदार संघात सध्या तरी अपक्ष उमेदवार म्हणून युवा नेते विवेक कोल्हे निवडणूक लढणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी काम करण्यास सुरुवातही केली आहे. विवेक कोल्हे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे परंतु जाणकारांचे मते विवेक कोल्हे यांचा निर्णय हा दूरगामी प्रभाव करणारा ठरणार आहे
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ जिल्हानिहाय मतदार
नाशिक २३६६८,नंदुरबार ४६०७, अहमदनगर १४९८५, धुळे ८२९७, जळगाव १३२२९ असे एकूण ६४७८६ मतदार असून यात महिला २०५८२ मतदार , पुरुष ४४२०४ मतदार, आहेत.
२०१८ मध्ये एकूण ५३८९२ मतदार होते २०२४ मध्ये एकुन ६४७८६ इतके मतदार झाले असून गेल्या सहा वर्षात १० हजार ८९४ इतकी मतदारांची संख्या वाढली आहे.
पाच जिल्ह्यातील मतदानापैकी नाशिक जिल्ह्यातील मतदारांची संख्या सर्वात जास्त २३६६८ इतकी आहे तर त्या पाठोपाठ कोपरगाव मतदार संघातील सुमारे १४९८५ मतदार संख्या आहे अहमदनगर आणि नाशिक या दोन मतदारसंघातील मतदारांची संख्या ३८६५३ असुन तर नंदुरबार, धुळे व जळगाव या तीन जिल्ह्याचे एकूण मतदार संख्या २६१३३ आहे एकूण नगर नाशिक ची संख्या १२५२० मतांनी जास्त आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यातीलच मताधिक्य हे उमेदवाराचा विजय ठरवणारे आहे
विद्यमान आमदार किशोर दराडे आणि युवा नेते विवेक कोल्हे शैक्षणिक संस्थाचालक आहेत. या दोघांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार की, आणखी काय निर्णय होणार हा येणारा काळच सांगेल. या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढे ढकलली आहे. त्यामुळे कोल्हेंना निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने कोल्हे यांनी शिक्षक मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन केल्याचे दिसते.
निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय, महाराष्ट्रात १० जूनला होणारं मतदान पुढे ढकललं
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात १० जूनला मतदान होणार होतं. पण ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात होती. १० जूनला अनेक शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विवेक कोल्हेंना निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे.
Post Views:
77