कोपरगाव  मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम झालीच नाही,

कोपरगाव  मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम झालीच नाही,

In Kopargaon constituency, there was no color rehearsal of the Legislative Assembly.

प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीचाही आखडता हातBJP and NCP also have a strong hand in campaigning

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir24 May , 20.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव  विधानसभा मतदारसंघात यंदा २०१९ पेक्षा दोन टक्क्यांनी कमी मतदान झाले. घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनलाच समजणार आहे….

कोपरगाव  : शिर्डी  लोकसभेची निवडणूक म्हणजे कोपरगाव  विधानसभा मतदारसंघाची रंगीत तालीम असली तरी महायुती म्हणून काळेकोल्हे एकत्र असल्यानेभाजपच्या व  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात हात आखडता घेतल्याचे दिसून आले.

प्रचारादरम्यान जेव्हा वरिष्ठ नेते व्यासपीठावर असत, तेव्हाच महायुतीचे आमदारकीसाठी इच्छुक नेते दिसत होते. त्यातही ज्या व्यासपीठावर विखे त्या व्यासपीठावर कोल्हे नसायचे  तर ज्या व्यासपीठावर कोल्हे त्या व्यासपीठावर विखेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती विशेष म्हणजे या निवडणुकीत काळे कोल्हे एकत्र असल्यामुळे व वंचितच्या उत्कर्षा  रुपवते यांची एन्ट्री झाल्याने कोपरगाव    विधानसभा मतदारसंघात यंदा २०१९ पेक्षा दोन  टक्क्यांनी कमी मतदान झाले. घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनलाच समजणार आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे कोल्हे यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यात शिर्डी लोकसभेची जागा शिंदे शिवसेनेला मिळाली, भाजप आणि अजित पवार गट राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीतील  स्थानिक होते. सुरुवातीला लोखंडे यांच्यासाठी निवडणूक सोपी वाटत होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती व लोखंडे यांच्याविषयी दहा वर्षांतील नाराजी याचा फायदा वाकचौरेना होईल, असे चित्र मतदार संघात दिसून येत होते मात्र वंचितच्या माध्यमातून उत्कर्षा रुपवते यांनी एन्ट्री घेतल्याने त्याही मतदानातून दिसून आल्या.

मतदारांपर्यंत पोहोचविण्याची कसरत

शिवसेनेमधून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर लोखंडे शिंदेंसोबत गेले, पण त्यांच्याबरोबर शिवसेनेतून मोजकेच नेते गेले. दमदार निष्ठावान शिवसैनिक नेते मात्र ठाकरे शिवसेनेतच राहिले परंतु,  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असल्याने येथे त्यांची जेवढी ताकद  आहे. तेवढीच ताकद  भाजपा कोल्हे गटाचीही  आहे, त्यात वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांची दमदार एन्ट्री  झाली तरीही कोपरगाव मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. कोपरगावमधील बहुतांश भागात लोखंडे वाकचौरे  व उशिराने आलेल्या रूपवते यांना प्रचारादरम्यान पोहोचता आले नाही की पोहोचू दिले नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे  लोखंडे गेली दहा वर्ष खासदार असल्याने एकदा काळेंच्या मदतीने तर एकदा कोल्हेंच्या मदतीने निवडून आले असल्यामुळे त्यांचे काळे कोल्हे या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. यावेळेस तर महायुतीच्या नावाखाली काळे कोल्हे दोघेही लोखंडेबरोबर होते असे असले तरी जनतेची मात्र त्यांच्यावर मोठी नाराजी होती त्यामुळे नेहमीप्रमाणे लोकसभा निवडणूक ही आमने-सामने लढणाऱ्या कोपरगाव विधानसभेचे उमेदवार काळे व कोल्हे यांच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम झालीच नाही असे असले तरीही दुसऱ्या अर्थाने ती उत्कर्षा रूपवते यांच्यासाठी मात्र रंगीत तालीम ठरू शकते

विधानसभेची गणिते

लोकसभेच्या निवडणुकीवर विधानसभेची गणिते ठरणार आहेत. मागील वेळी कोपरगाव निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे  यांचा निसटता पराभव  करत अजित पवार गटाचे आशुतोष काळे  विजयी झाले होते. आता हे दोन्ही उमेदवार महायुतीत आहेत. भाजपच्या स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे  हे दोघेही  विधानसभेसाठी इच्छुक आहेत. विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुती राहिली तर विधानसभेच्या तिकिटासाठी अजित पवार गट व भाजपच्या नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यावेळी मात्र या दोघांपैकी कोणालातरी वेगळा विचार करावा लागेल आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा उत्कर्षा रूपवते तिसऱ्या उमेदवार म्हणून उभ्या  राहिल्यास नवल वाटावयास नको !

Leave a Reply

You cannot copy content of this page