कोपरगाव पालिकेला नालासफाईला करण्यासाठी आचारसंहितेची अडचण
Problem of code of conduct for Kopargaon Municipality to clean the drains
अतिवृष्टी झाल्यास स्लम एरियातील रहिवाशांना किंमत मोजावी लागणार In case of heavy rainfall, the slum dwellers will have to pay the price
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir24 May , 20.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती असलेल्या खंदकनाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यासाठी नगरपालिकेला आचारसंहिते अभावी पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई न झाल्यास झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मोठी किंमत मोजावी लागणार
कोपरगाव शहराच्या तिन्ही बाजूंनी गोदावरी नदी असून चौथ्या बाजूला खंडकनाला आहे गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शहराला आपल्या कवेत घेत असताना चौथ्या बाजूने खंदकनाल्यातून पुराचे पाणी गावात शिरते आणि कोपरगावची नाकेबंदी होते. त्यामुळे शहरातून बाहेर पडता येत नाही कोपरगाव शहरात ५५% झोपडपट्टी भाग आहे त्यामुळे खंदकनाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई होणे अत्यंत आवश्यक आहे
लवकरच पावसाळा आरंभ होत आहे, पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारी, नाल्या साचलेली,घाण,प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या वस्तू ,काडी सडलेला कचरा, कागद,दगड,गोटे काढून या गटारी व नाल्यांचा मार्ग मोकळा व्हावा,व पावसाचे पाणी सरळ वाहून जावे,ते कोठेही तुंबू नये व नागरी वस्तीत पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेणे गरजेचे त्याचे टेंडर काढण्यासाठी आचारसंहितेची कारणे सांगितली जात आहे त्यामुळे ही कामे ठप्प झाली आहे. यापूर्वी थांबत नाल्यातील कचरा केवळ नावाला काढला जातो, तो काढून तिथेच वरती टाकण्यात येतो,तो परत पावसाने नाल्यात जातो अशी अवस्था वर्षानु वर्ष कोपरगावचे नागरिक पाहत आले आहेत, विविध प्रभागात वार्डात तिथे पाणी तुंबते त्यावर कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत.रस्त्या लगतच्या गटारीची साफ सफाई झाली पाहिजे अशी वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांची इच्छा आहे, मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहे. वर्षानुवर्ष साठलेल्या या गटारीतून घाणीचे ढीग बाहेर काढणे गरजेचे असून या गटारी मोकळ्या करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, पालिकेच्या स्वच्छता पथक सोबत अग्नीशमन दलाची गाडीही आहे,ज्याने पाणी फवारून घाणीने जाम झालेल्या गटारी लवकर मोकळ्या करण्यात याव्यात,गेल्या वर्षी विविध प्रभागात पावसाचे पाणी घुसून नालीचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांच्या घरात शिरले होते ती वेळ पुन्हा येऊ नये अशी गोरगरीब नागरिकांची मनोमन इच्छा आहे. नगरपालिका कार्यालयात बहुतांश पदे रिक्त आहेत, तर काही रिटायर होण्याच्या मार्गावर आहे. आरोग्य विभागात तर अपुरे कर्मचारी व लाख दीड लाख लोकसंख्या असलेल्या कोपरगावच्या विविध प्रभागात बोटावर मोजण्या इतक्या कर्मचाऱ्यांवर साफसफाई चालत आहे हे विशेष. त्यातच गेल्या तीन साडेतीन वर्षापासून प्रशासकराज असल्याने बहुतांशी कामे खोळंबली आहेत.
Post Views:
48