उजनी योजनेतील कोल्हेंचा सहभाग नाकारून आ. काळेंकडून दिशाभूल,

उजनी योजनेतील कोल्हेंचा सहभाग नाकारून आ. काळेंकडून दिशाभूल,

Decline the participation of Kohles in Ujani Yojana. Misled by the Kales,

वास्तवाची माहिती तुम्हीच घ्या,-कैलास राहणे Know the reality yourself,-Kailas Rahne

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir24 May , 20.40 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :  उजनी जलसिंचन योजनेबाबत माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे व कोल्हे परिवारावर वारंवार असत्य आरोप करत असलेल्या  आमदार आशुतोष काळे  यांनीच आधी वास्तव काय होते त्याची माहिती घ्यावी व त्यानंतरच सवंग लोकप्रियतेसाठी बातम्या द्याव्यात असा सल्लाही यावेळी आमदार आशुतोष काळे यांना भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी गुरुवारी (२३मे) प्रसिद्धी  पत्रकातून दिला.

 त्यात त्यांनी तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांची जबाबदारी असतांना देखील या योजनेकडे ढुंकूनही पाहिले नाही  असा आरोप  राहणे यांनी केला .माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व माजी आमदार  स्नेहलता कोल्हेंच्या  पाणी धोरणावर टीका करणारे आज त्यांची सत्ता आल्यावरही तेच धोरण राबवत असल्याची टीका राहणे यांनी केली आहे. 
कोपरगाव मतदार संघाच्या पश्चिम भागातील रांजणगाव देशमुखसह सात  गावांच्या पिण्याच्या पाण्याची उजनी जलसिंचन योजना व्यक्तिगत व कारखान्याच्या खर्चातून चालविली विज बिल कायमस्वरूपी डिस्कनेक्ट झाल्यानंतर २०१४ ते २०१९ या काळातील तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न करून बंद पडलेले चालू न होणारी वीज  नगर वीज वितरण कार्यालयात स्वतः पैसे भरून चालू केली  याचा मी साक्षीदार आहे तिच वीज आजही पुढे चालू  आहे असे असताना आ. काळे सौ.  कोल्हे यांच्या काळात या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याची चुकीची माहिती देतात. वास्तविक आशुतोष काळे हे  स्वत: आमदार होण्याआधी सौ. स्नेहलता कोल्हे  ह्या आमदारच होत्या. आमदार काळे यांना सगळे माहिती आहे, मात्र ते आमदार पदावरून स्वपक्षाचा अजेंडा राबवत आहेत अशी  टीका राहणे यांनी केली.
 सत्ता नसतानाही माजीमंत्री  स्व. शंकरराव कोल्हे  व बिपिन कोल्हे यांनी  कारखान्याची माणसे व  वीजमोटारी देऊन रांजणगांव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस- सोयेगांव, अंजनापुर, बहादरपुर व मनेगांव या सात  जिरायती  गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले आहे, आजही कालव्यातून पाणी घेताना त्याचे पाईप, चाऱ्या, वितरिका देखील कोल्हे कारखान्याने केलेल्या खर्चातीलच आहे असा टोलाही  राहणे यांनी  शेवटी लगावला. 

Leave a Reply

You cannot copy content of this page