कर्मवीर काळे कारखाना सभासदाच्या वारसाला दोन लाखाचा धनादेश आ. काळे यांनी दिला
वृत्तवेध ऑनलाईन 31 July 2020
By: Rajendra Salkar,18.00
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माहेगाव देशमुख येथील सभासद सूर्यभान जानकू पानगव्हाणे यांचे गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून जाऊन अपघाती निधन झाले होते. आमदार आशुतोष काळे यांनी दोन लाखाचा विमा धनादेश मयत सभासदाचे वारस राजेंद्र सूर्यभान पानगव्हाणे यांना दिला.
यावेळी कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी.बी.सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.