कोपरगावात मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यां १२ वर पोलिसांची दंडात्मक कारवाई
वृत्तवेध ऑनलाईन । 1 August , 2020 10 : 20
By : Rajendra Salkar
कोपरगाव : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी शिथिलतेच्या कालावधीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यां १२ नागरिकांवर शुक्रवारी (३१जुलै) पोलिसांची दंडात्मक कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर दुचाकी घेऊन डबलशिट तसेच विनामास्क लावून फिरत असल्याचे दिसून आल्याने शुक्रवारी दिवसभरात शहरातील विविध भागात १२ दुचाकीस्वार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली.
कोपरगाव पोलीस ठाण्यामार्फत शुक्रवारी कोपरगाव शहरात वाहन विविध भागात तपासणी करण्यात आली. यात दीपक नामदेव शेलार (३०) कोपरगाव, बबन कारभारी बोरणारे (६२) संवत्सर, अन्सार नसीर सय्यद (३२) गांधीनगर, जूनेद कैसर शेख (२८) ओमनगर, बाबासाहेब शांताराम मोकळ (३५) टाकळी, वैभव दिलीप पवार(२९) वागदर्डी- चांदवड, सचिन सुदाम गायकवाड (२८) बेळगाव वैजापूर, राजेंद्र नामदेव मैंदड (२२) शिवाजी रोड, सुरेश बाळू पुंडे (३०) वैजापूर, जुबेर जब्बारखां पठाण (२५), झाकिर हारून पठाण (२०) लक्ष्मीनगर, अजय बाबासाहेब गायकवाड (१९) जेऊर पाटोदा, बेशिस्त नागरिक पुणतांबा चौफुली, जपे हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, बैलबाजार, जुना टाकळी नाका, गांधी पुतळा, सुदेश थिएटर, बिरोबा चौक, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, नागरे पेट्रोल पंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी विनाकारण दुचाकीवर तोंडाला मास्क न लावता डबलशिट फिरताना आढळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळे, पोकाॅ, अंबादास रामनाथ वाघ पो.कॉ, जयदीप दामोदर गवारे पोकाॅ अनिस अब्दुल शेख आदींनी
भा.द.वि. कलम 188(2), 269, 271 प्रमाणे कारवाई केली आहे.