शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रापासून अशा  प्रवृत्तींना लांब ठेवा

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रापासून अशा  प्रवृत्तींना लांब ठेवा

Keep such tendencies away from sacred areas like education

आमदार किशोर दराडे यांच्यावर संभाजी ब्रिगेड ची टीकाSambhaji Brigade criticizes MLA Kishore Darade

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun23June , 8.10 Am.By सालकर राजेंद्र

अंमळनेर (प्रतिनिधी )- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात अर्थ पूर्ण प्रचार व त्यासोबत दिलेली पैठणी यात शिक्षकांना ” गुंडाळण्याचे काम होत आहे, शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रापासून अशा प्रवृत्तींना लांब ठेवा, असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक श्याम जयंतराव पाटील यांनी शिक्षक मतदारांना केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, बुधवार २६ जून २०२४ रोजी नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून. ही निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची असणार आहे कारण गेली अनेक दशके केवळ शिक्षकांच्याच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातल्या समस्यांवर योग्य भूमिका मांडण्याचे काम शिक्षक मतदारसंघातून निवडून जाणारे प्रतिनिधी प्रभावीपणे करत आलेले होते. परंतु गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या किशोर दराडे यांनी केलेला अर्थ पूर्ण प्रचार व त्यासोबत दिलेली पैठणी यात शिक्षकांना ” गुंडाळण्याचे काम केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक शिक्षक मतदार संघातील शिक्षकांची चर्चा तर झालीच परंतु गेली पाच वर्षे यांची शिक्षकांच्या नेमक्या कोणत्या समस्या समजून घेतल्या…? त्यासाठी काय आवाज उठवला…? तसेच शिक्षण क्षेत्रावर दूरगामी बाईट परिणाम करणारे NEP अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत असताना नेमकी यांनी विधानपरिषदेत काय भूमिका घेतली…? त्यावर काय मंथन केले…? हे न सांगता पैठणी सोबत आता सूटही वाटू आणि या डबल फेऱ्यात शिक्षकांना पुन्हा गुंडाळू या भूमिकेतून सध्या दराडे वावरताना दिसत आहेत. विधानपरिषदेत सोडा परंतु एकूणच शैक्षणिक व सांस्कृतिक वर्तुळात देखील आपले (अ) ज्ञान उघडे पडण्याच्या भीतीने ते कधीच दिसले नाहीत. त्यांचा मतदारसंघात असणाऱ्या अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे विद्रोही मराठी साहित्य संमेलन व अ.भा.मराठी साहित्य संमेलन पार पडले परंतु साहित्याचा आणि माझा काय संबंध” अशी भूमिका घेत ते या दोन्ही संमेलनाकडे साधे फिरकले सुद्धा नाही यावरून त्यांची सांस्कृतिक अभिरुची देखील लक्षात येते.

 

खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ची शेकडो पदे असताना केवळ शिक्षक या घटकालाच आपला हक्काचा प्रतिनिधी निवडण्यासाठी स्वतःचा स्वतंत्र मतदारसंघ आहे. शिक्षक केवळ विद्यार्थीच नव्हे, तर राष्ट्रही घडवीत असतात ही भूमिका यामागे आहे. खानदेशच्या भूमीला साने गुरुजीं सारख्या राष्ट्र शिक्षकांचा वारसा आहे. एवढी घटनात्मक ताकद व पावित्र्य या मतदार संघाला असल्याने यावेळी शिक्षक बंधू-भगिनींनी याचा गांभीर्याने विचार करून जो प्रतिनिधी आपण निवडला म्हणून आपल्याला अभिमानाने सांगता येईल अशाच प्रतिनिधीची निवड करावी. समाज आपल्याकडे एक आदर्श म्हणून पाहत असल्याने आपली प्रतिमा बिघडवणाऱ्या अशा प्रकारच्या ” प्रवृत्तींना दूर ठेवत त्यांचा प्रचार करण्याचे पातक देखील करू नये.

निदान शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रवृत्तींना आपल्या प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देऊ नये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक श्याम जयंतराव पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page