कोपरगावातुन एकट्याने चोरी करून नाशिक जिल्ह्यातमध्ये विक्री, पावणे १३ लाखाच्या २४ दुचाकी जप्त; 

कोपरगावातुन एकट्याने चोरी करून नाशिक जिल्ह्यातमध्ये विक्री, पावणे १३ लाखाच्या २४ दुचाकी जप्त; 

24 two-wheelers worth 13 lakhs were seized after stealing from Kopargaon alone and selling them in Nashik district;

कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्यांची धाकधूक वाढली  As two-wheelers are available at low prices, the fear of those buyers increased

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue25June , 20.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : कमी किंमतीत दुचाकी मिळते म्हणून विकत घेताना ती चोरीची नाही ना, याची खात्री करा. कारण कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्यांला अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून १२ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या तब्बल २४ दुचाकी जप्त केला. एका जिल्हातून दुचाकी चोरून दुसऱ्या जिल्ह्यात विकणाऱ्या या चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केलीच. शिवाय कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करून विक्री करणाऱ्या  एकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोर नावे कृष्णा प्रकाश शिंदे (वय ५५)रा. इंदिरानगर कोपरगाव याला अटक केली असून  सर्व मोटार सायकल विकणारा  श्रावण सखाराम वाघ रा. सोमठाण जोश ता. येवला जि. नाशिक 
 याला ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना  बातमीदाराकडून माहिती मिळाली की, 
श्रावण सखाराम वाघ रा. सोमठाण जोश ता. येवला जि. नाशिक याच्याकडेच चोरीच्या मोटरसायकली आहेत. त्याप्रमाणे प्रमाणे सापळा रचून  श्रावण वाघ याला ताब्यात घेतले. त्याने दुचाकीचोरीचा मुख्य सुत्रधार कृष्णा प्रकाश शिंदे असल्याचे सांगितले. पोलिसानी कारवाई करत आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शिंदे हा  कोपरगाव मध्ये   चोरलेल्या दुचाकी तो सोमठाणा जोस तालुका येवला येथे घेऊन जात होता. तेथून तो पुढे आरोपी  श्रावण वाघ मदतीने चोरीच्या दुचाकी नाशिक जिल्ह्यात येवला नांदगाव या परिसरात विक्री करत होता 
नाशिक व येवल्याच्या  ग्रामीण भागात आरोपी कमी कमीत दुचाकीची विक्री  करत होते. अगदी कमी किंमतीती दुचाकी मिळत होती म्हणून अनेक जण ती खरेदी करत होते. कागदपत्रांबाबत दुचाकी घेणाऱ्याने विचारणा केली असता. कागदपत्र लवकरच देऊ असे आश्वासन देत होते.
 दूचाकी चोर कृष्णा शिंदे यांच्यावर कोपरगाव शहर पोलिसात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरल्याच्या चोरल्याचे २७  गुन्हे दाखल आहेत पैकी १२ लाख ७७ हजाराच्या २४ दुचाकी जप्त करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्यांची मात्र धाकधूक वाढली  आहे. 
सदरची कारवाई राकेश ओला सो
, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक  वैभव कल्बमें  उपविभागीय पोलीस अधीकारी  शिरीष वमने शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली, पो.नि. प्रदिप देशमुख, स.पोनि.विश्वास पावरा, सपोनि मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोहेकॉ बी.एस. कोरेकर, पोहेकॉ तिकाणे, पोहेकॉ जालींधर तमनर, पोहेकॉ अर्जुन दारकुंडे, पोहेकॉ अशोक शिंदे नेम उपविभागीय पोलीस कार्यालय शिर्डी , पोहेकॉ दिपक रोकडे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ श्रीकांत कुऱ्हाडे, पोकॉ महेश फड, पोकॉ/बाळु धोंगडे सर्व नेमणुक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page