नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे नऊ हजार मतांनी विजयी
Kishore Darade won in Nashik Teacher Constituency by nine thousand votes
दराडे ३२ हजार ३०९,कोल्हे २३ हजार ४४४ ऐकुन मते Darade 32 thousand 309, Kohle 23 thousand 444 votes
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारीडॉ.प्रवीण गेडाम यांनी केली घोषणाDivisional Commissioner and Election Returning Officer Dr. Praveen Gedam made the announcement
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu2July , 9.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ३२ हजार ३०९ मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.
पहिल्या फेरीची (३०हजार पर्यंतची) मतमोजणी संपली.११’ पहिल्या फेरी अखेर किशोर दराडे- १११४५, संदीप गुळवे-७०८८, विवेक कोल्हे- ९३७० दराडे १७७५ मतांची आघाडीवर
दुसऱ्या फेरी अंती आकडेवारी ( ६० हजार पर्यन्त मोजणी )
किशोर दराडे – २४३९३
विवेक कोल्हे – १५९८५
संदीप गुळवे – १४९९२
दुसऱ्या फेरी अंती किशोर दराडे ८४०८ मतांनी आघाडीवर
शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर, ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर
मतमोजणीत दुसऱ्या स्थानावर अपक्ष विवेक कोल्हे
उर्वरित ४८४८ मतांची मोजणी बाकी, अवैध मते वगळून कोटा निश्चित होईल.
तिसरी फेरी एकूण मतदान – ६४ हजार ८५३
किशोर भिकाजी दराडे : २६४७६
अँङ गुळवे संदीप गोपाळराव (पाटील) : १६२८०
ॲड महेंद्र मधुकर भावसार :१३१
कोल्हे विवेक बिपिनदादा: १७३७२
भागवत धोंडीबा गायकवाड : ९
अनिल शांताराम तेजा : ७
अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे : २५९, इरफान मो इसहाक : -१७,
कचरे भाऊसाहेब नारायण :११९५
कोल्हे सागरदादा रविंद्र :६६
कोल्हे संदीप वसंतदादा : ७४
गव्हारे गजानन पंडीत : १५१
गुरुळे संदिप वामनराव : १५२
झगडे सचिन रमेश :१०७
दिलीप काशिनाथ डोंगरे: ७८
आर.डी.निकम : ५५२
पै.डॉ.पानसरे छगन भीकाजी :१०
बोठे रणजित नानासाहेब: ०
महेश भिका शिरुडे : १५
रतन राजलदास चावला :६८
संदीप गुळवे पाटील : १३२
वैध मते : ६३१५१
अवैध मते : १७०२
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४ हजार८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६३ हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७०२ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १९ व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. १९ व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरा फेरी अखेर १७ हजार ३९३ मते पडली असून सर्वाधिक पसंती
क्रमाची ६ हजार ७२ मते पडली.
मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा., जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल , जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.