कोपरगावातील दारू, मटका, जुगार तत्काळ बंद करा

कोपरगावातील दारू, मटका, जुगार तत्काळ बंद करा

Immediately stop liquor, matka, gambling in Kopargaon

खासदार अधिकारी ओळख  बैठकीत शिवसैनिकांचा हल्लाबोलShiv Sainiks attack in MP officer identification meeting

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir5July , 20.10 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : शहरात दारू, मटका, जुगार ऑनलाइन लॉटरी कुत्ता गोली विक्री खुलेआम सुरू असून तो तत्काळ बंद करावा, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि या व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी गुरुवारी तहसील कार्यालयातील  खासदार व महसूल अधिका-यांच्या ओळख परेड बैठकीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  केली

दारू, मटका, जुगार तत्काळ बंद करा  असा अवैध धंद्यावरून जोरदार  हल्लाबोल यावेळी शिवसैनिकांनी केला
   गुरुवारी (दि ४जुलै)  रोजी ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे कोपरगाव तहसील कार्यालयात महसूल अधिकारी यांच्या ओळखीसाठी आले होते यावेळी त्यांच्या या वेळेस त्यांच्याबरोबर शिवसैनिक होते या ठिकाणी झालेल्या बैठकीत  शहरातील कायदा व सुव्यवस्थेचाही आढावा घेतला गेला.  यावेळी शिवसैनिकांनी   पोलीस अधिकाऱ्यांना  चांगलेच धारेवर धरले. यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही अवैध व्यवसायांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली . शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव  म्हणाले, शहरात , मटका, जुगार  ऑनलाइन लॉटरी  गांजा कुत्ता गोली हातभट्टी दारू सर्वत्र सुरू आहे. पोलीस हे अवैध धंदे बंद असल्याचा दावा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. ठिकठिकाणी गावठी दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक सुरू आहे.  मटक्याच्या दोन पेढे असून सुमारे १८०  पंटर काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला असे असतानाही पोलिसांनी धाडी घालून मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे ऐकिवात नाही. शहरी व ग्रामीण नागरिकांचा दारू, मटका, जुगारला ऑनलाइन लॉटरी चरस गांजा कुत्ता गोली या विक्रीला प्रचंड विरोध असतानाही जनतेच्या नाकावर टिच्चून अप्रत्यक्ष पोलीस संरक्षणात हे धंदे चालविले जात आहे. मटका थेट तहसील कार्यालयाच्या दारापर्यंत  पोहोचल्याचे सांगून शहरात  पोलिसांच्या ‘आशीर्वादा’ने  गुटखा मटका  गांजा अफू  कुत्ता गोली  विक्री सर्रास सुरू असल्याचा प्रकार कैलास जाधव यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिला. कन्या शाळेसमोरील पडकी इमारत  उर्दू शाळेसमोरील झोपडी  ही गरदुल्यांचा अड्डा बनल्याची  तक्रारही जाधव यांनी यावेळी केली.  
यावेळी  तहसीलदार संदीप कुमार भोसले पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख माजी नगराध्यक्ष संजय सातभाई कैलास जाधव सनी वाघ कालू आप्पा आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, वर्षा शिंगाडे, मुकुंद सिनगर, मनोज कपोते, विशाल झावरे, राहुल देशपांडे आदीसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते
अवैध धंदे बंद असल्याचा दावा  पोलिसांनी केला असला तरी  प्रत्यक्षात आजही  सर्व अवैध धंदे  सर्रास  सुरू असल्याचा प्रकार  सनी वाघ यांनी यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिला.  या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची  तत्काळ बदली करावी करा,  अशी भूमिका आपण बैठकीत मांडल्याचे  ठाकरे सेनेचे शहरप्रमुख  सनी वाघ यांनी स्पष्ट केले.   
यावेळी  तहसीलदार संदीप कुमार भोसले पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, कैलास जाधव, सनी वाघ, कालूआप्पा आव्हाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, वर्षा शिंगाडे, मुकुंद सिनगर, मनोज कपोते, विशाल झावरे, राहुल देशपांडे आदीसह वीज वितरण कंपनी व विविध विभागाचे अधिकारी तसेच शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते

चौकट 

कुत्ता गोली व गांजा अफू यासारख्या   नशे मुळे   शहरातील तरुण पिढी  बेभान झाली असून कुणाची त्यांना ओळख राहिली नाही नशेडी झालेले युवक  कुठली तमा न बाळगता वाटेल ते धाडस  करण्याच्या घटना शहरात वाढल्या आहेत तेव्हा बाजारतळातील  भांगरे व्यापारी संकुल,शहरातील नव्याने  विकसित होत असलेल्या भागातील ओपन प्लॉट,युवकांचे अड्डे बनले आहेत  या प्रकरणात पोलिसांनी गस्त घालून पोलिसांनी बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे- राजेंद्र झावरे,ठाकरे सेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख

Leave a Reply

You cannot copy content of this page