विद्यार्थिनीच्या  मृत्यूप्रकरणी सहा वर्षानंतर शिक्षकांवर खूनाचा गुन्हा दाखल, 

विद्यार्थिनीच्या  मृत्यूप्रकरणी सहा वर्षानंतर शिक्षकांवर खूनाचा गुन्हा दाखल, 

After six years in the case of the death of a student, a case of murder has been filed against the teacher.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir5July , 20.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : शाळेत उशिरा आली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षकाने धक्का दिल्याने खाली पडली  ती आजारी पडून तिचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी भादंवि ३०२ नुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये तब्बल सहा वर्षानंतर शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. 

शिक्षकानी मारहाण केल्यामुळे आपली मुलगी मयत झाल्याचा तक्रारी अर्ज २०१८ साली पढेगाव येथील मयत मुलीच्या आईने कोपरगाव न्यायालयात दाखल केला होता. सदर प्रकरणी न्यायालयाने आरोपी शिक्षका विरोधात भादवी कलम  ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच तालुका पोलिसांना दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारातील चारी नंबर ४५ येथील  शाळेत 
जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारी मुलगी कु तृप्ती दिपक भोसले (वय ९ वर्षे) हि शाळेत उशिरा आली म्हणून शिक्षक सुनील दिगंबर हांडे रा. निवारा ता कोपरगाव यांनी तिस जाब विचारला व तिला शाळेच्या आवारात उभे केले नंतर तिस छातीवर धक्का दिला त्यामुळे  ती पाय-यावरून खाली पडली त्यात तीला गंभीर दुखापत झाली तिचे वर प्राथमिक औषधोपचार केले नंतर तिस लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पुढील औषधोपचारासाठी दाखल केले परंतु उपचार सुरू असताना या विद्यार्थ्यांनीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.या प्रकरणी  मयत विद्यार्थ्यानीची  आई उमा दीपक भोसले (वय ३५ वर्ष) रा पढेगाव कोपरगाव यानी कोपरगाव न्यायालयात तक्रार अर्ज  दाखल  केला होता. सदर प्रकरणी आज सहा वर्षानंतर आज  न्यायालयाने तालुका पोलिसांना आरोपी  शिक्षक सुनिल दिगंबर हांडे (वय ४२ वर्ष) यांच्या विरोधात भादंवी कलम  ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने आरोपी विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे ह्या करत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page