पैशांचा पाऊस पाडणे पडले महागात; फसवणूक व त्यातून कायदा हातात घेतल्याने  गुन्हा दाखल

पैशांचा पाऊस पाडणे पडले महागात; फसवणूक व त्यातून कायदा हातात घेतल्याने  गुन्हा दाखल

Raining money is expensive; A case has been registered for cheating and taking the law into one’s hands

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat6July , 20.00 Pm.By सालकर राजेंद्र

 

कोपरगाव : पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करणे व पैसे डबल करण्याच्या आमिशाला बळी पडणे दोन्ही पक्षांना महागात पडले असून जवळपास ६-७ जणांना जेलची हवा खावी लागणार आहे.

याप्रकरणी जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा  पोलिसांकडून कोपरगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग झालेला आहे. २२ जून रोजी एका अपहरणाच्या गुन्ह्यातून एक संपूर्ण फिल्मी मालिका समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील दिलीप भिकाजी इंगळे (वय४५ ) रा. इंदिरानगर जानेफळ जिल्हा बुलढाणा यांने अमोल जयसिंग राजपूत रा जानेफळ जि बुलढाणा यांना  पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. 
पैशाचा पाऊस पडण्यासाठी दिलीप इंगळे सह अमोल जयसिंग राजपूतव इतर चार-पाच जण असे सर्वजण कोकमठाण परिसरात आले असता यातील आरोपी यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे कारणावरुन त्याचे अपहरण करुन पांढऱ्या रंगाच्या ट्रिबेर कार मधून २२ जून रोजी रात्री दहा अकरा वाजेच्या सुमारास कोकमठाण शिवारातील एस जे एस हॉस्पिटल  या ठिकाणावरून कोठेतरी घेवुन गेले आहेत
याप्रकरणी पाऊस पाडणाऱ्याची पत्नी
ज्योती दिलीप इंगळे (वय ३५) हिने जानेफळ पोलीस स्टेशन ता. मेहकर जि. बुलढाणा येथे फिर्याद दिल्याने ०/२४ भा.द.वि.क. ३६५, ३४ प्रमाणे फिर्याद दिल्याने सदरचा गुन्हा सी. सी. टी. एन. एस. वर्ग होवुन आल्याने गुन्हा रजी. दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page