कोपरगावमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई; गौण खनिज उत्खनन प्रकरणी साडे ११ लाखाची दंडात्मक कारवाई
Big operation of revenue department in Kopargaon; Penal action of 11.5 lakhs in minor mineral mining case
तीन वर्षांनी लागला निकालAfter three years, the result came
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat6July , 19.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील ग्रामसेविका व तत्कालीन सरपंच यांनी सक्षम महसूल अधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशररित्या ९० ब्रास गौण खनिज (मुरूम) उत्खनन प्रकरणी ११लाख ४० हजार ,८००/- ₹ दंडात्मक कारवाई केल्याचा आदेश तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी काढल्याने खळबळ उडाली आहे.तात्कालीन सरपंच विकास अशोक मोरे व ग्रामसेविका सौ संध्या अवचिते – बत्तीशेंना मोठा धक्का बसला आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील ग्रामसेवक सौ अवचिते/बत्तीसे व तत्कालीन सरपंच विकास मोरे यांनी महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता गारदा नदी लगत मुरूम या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केली या बाबत नाटेगाव येथील रहिवासी ॲड. दिपक पोळ यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४७(७) अनुसार तक्रार दाखल केली त्यानंतर मंडलाधिकारी कोपरगाव यांनी मौजे नाटेगाव येथील गारदा नदी मध्ये जाऊन सरपंच विकास मोरे व ग्रामसेविका समक्ष २९/७/२०२१ पंचनामा केला. व त्या प्रमाणे लेखी खुलासा मागितला सदर खुलासा संयुक्तिक नसल्या कारणाने खुलासा अमान्य करण्यात आला त्यावर तहसील दार कोपरगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७) व त्यात महाराष्ट्र शासन अधिनियम क्र २७/२०१५ दि१७/८/२०१५ नुसार कऱण्यात आलेल्या सुधारणा करण्यात प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सदर विना परवानगी व अनधिकृत रित्या मुरूम उत्खनन करून वाहतूक केली असुन प्रति २४००₹ प्रमाणे ९०ब्रास १०,८०,०००/- व रॉयल्टी ६००/- प्रति ब्रास प्रमाणे ५४,०००/- व जिल्हा खनिज प्रतिष्ठान स्वामित्व धन १०% प्रमाणे ६० रू प्रति ब्रास प्रमाणे ५४००/- व भू पृष्ठ भाडे स्वामित्व १०% प्रमाणे ५४,४०० अशी एकुण ११,४४,८००/-₹ चा दंड मुदतीत न भरल्यास सदर रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल कऱण्यात येइल असा आदेश तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिला आहे.
Post Views:
44