लोकशाहिर डॉ.अण्णाभाऊ साठेंचे सामाजिक जडणघडणीत अविस्मरणीय योगदान – बिपीन कोल्हे 

लोकशाहिर डॉ.अण्णाभाऊ साठेंचे सामाजिक जडणघडणीत अविस्मरणीय योगदान – बिपीन कोल्हे 

Unforgettable contribution of Lokshahir Dr.Annabhau Sathe in social formation – Bipin Kolhe

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu18July , 16.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :साहित्यरत्न, लोकशाहिर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी डॉ.अण्णाभाऊ साठे स्मारक कोपरगाव येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचे समाजावर मोठे ऋण आहे.त्यांच्या कार्याची व साहित्याची प्रेरणा समाजाला मिळावी यासाठी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे पहिले स्मारक कोपरगाव येथे निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.अतिशय दुर्मिळ असणारे छायाचित्र प्राप्त करून पुतळा निर्मितीसाठी पुढाकार घेतला, त्यानंतर महाराष्ट्रात आणि बाहेर अनेक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे अनेक स्मारक निर्माण झाले अशा जुन्या आठवणी उपस्थितांनी जागवल्या.
शाहिरी आणि समाज प्रबोधनातून सामाजिक सुधारणा आणि जडणघडण होण्यात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अविस्मरणीय आहे.सामाजिक सुधारणा हा कोणत्याही समाजाचा विकासाचा पाया असतो. महापुरुषांचा आदर्श हा पिढ्यांपिढ्या सर्वांना आदर्श जीवनाची दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल नेहमीच आदर ठेवत विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविला आहे.स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची जाणीव आपल्या कार्यातून करून देणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार सर्वांनी अभ्यासून सामाजिक प्रगती साधावी असे यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले.
या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, भाजपा शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,राजेंद्र बागुल, गोपीनाथ गायकवाड,सुखदेव जाधव, बाळासाहेब सोळसे,अनिल जाधव,संदीप निरभवणे,शंकर बिऱ्हाडे, शरद त्रिभुवन,सुजल चंदनशिव,सोमनाथ ताकवले,गोरख देवडे,बापू सुराळकर,श्रीराम वाणी आदींसह मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page