तिळवणी आरोग्य केंद्रास मंजुरी; आमदार काळेंचा पंचक्रोशीतील नागरिकांकडून सत्कार 

तिळवणी आरोग्य केंद्रास मंजुरी; आमदार काळेंचा पंचक्रोशीतील नागरिकांकडून सत्कार 

Approval of Tilwani Health Centre; MLA Kalen felicitated by the citizens of Panchkroshi

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu18July , 16.10 Pm.By सालकर राजेंद्र

 

कोपरगाव  : कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांची मागणीनुसार आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून  तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली याबद्दल येथील पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार अशितोष काळे यांचा गुरुवारी (दि १८) रोजी साई तपोभूमी येथील कार्यालयात आभार व्यक्त करून सत्कार केला. 

आ. आशुतोष काळे यांनी खूप पुण्याचे काम केले असून त्याची परतफेड तिळवणी, कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव गावातील सुज्ञ मतदार विधानसभा निवडणुकीत करून देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, तिळवणी गावासह परिसरातील कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कोपरगाव वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तिळवणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी या गावातील नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेवून याबाबत आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळविली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी लवकरात लवकर निधी मिळवून देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.याप्रसंगी तिळवणी व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे संचालक, तसेच तिळवणी,कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट –  पूर्व भागातील तिळवणी, आरोग्य केंद्रामुळे या पंचक्रोशीतील कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार असून  रात्री बे रात्री नागरिकांच्या आरोग्य प्रश्नी होणारी गैरसोय  आ.आशुतोष काळे यांनी दूर केली आहे हे सांगताना नागरिक भावनाविवश झाले होते यावरून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्व अधोरेखित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page